मुंबई- बॉलिवूडमधील लोकप्रिय जोडींच्या यादीत अभिनेता आणि पत्नी यांच्या नावाचा समावेश आहे. चाहत्यांना त्यांची जोडी खूप आवडते. दोघांनी १७ जानेवारी २००१ रोजी लग्नगाठ बांधली होती. त्याच्या लग्नाला आता २० वर्ष पूर्ण झाली असून त्याच्यातील प्रेम तसूभरही कमी झालेलं नाही. अक्षय कुमार आणि ट्विंकल नेहमीच चर्चेत असतात. दोघेही त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात खूप आनंदी आहेत आणि नेहमी एकमेकांची प्रशंसा करत असतात. काही वेळा दोघेही एकमेकांची गुपित चाहत्यांना सांगताना दिसतात. असाच एक किस्सा आहे जेव्हा ट्विंकलने जागा समोर अक्षयचं गुपित उघड केलं होतं. झालं असं की ट्विंकलने अक्षयच्या फॅशन सेन्स विषयी बोलताना सांगितलं होतं की, 'अक्षयकडे माझ्यापेक्षा जास्त चपलांचे जोड आहेत. इतकंच नाही तर अक्षयच्या कपाटामध्ये गुलाबी, हिरव्या, जांभळ्या आणि पिवळ्या रंगाच्या पॅन्टचं कलेक्शन आहे. हे ऐकून अक्षय म्हणाला की, ट्विंकलने त्याला नवीन पॅन्टचं कलेक्शन घ्यायला सांगितलं होतं. यावर ट्विंकल म्हणाली, 'हो मी नक्कीच म्हणाले होते पण संपूर्ण इंद्रधनुष्य विकत घ्यायला सांगितलं नव्हतं.' ट्विंकल पुढे म्हणते, 'अक्षयकडे ३५० प्रकारचे शूजही आहेत.' जेव्हा ट्विंकलला विचारण्यात आलं की त्यांच्यात कोण तयार होण्यासाठी जास्त वेळ घेतं, त्यावेळी ट्विंकलने स्वतःचं नाव घेतलं. पुढे ट्विंकलने खुलासा केला की, तिला तयार होण्यासाठी कोणाचीही मदत नसते. मात्र अक्षयला तयार करण्यासाठी ११ लोकांची टीम येते. त्यामुळे तो वेळेवर तयार होतो. लग्नानंतर ट्विंकलने बॉलिवूडमधून काढता पाय घेतला. ती तिच्या मुलांच्या संगोपनात व्यग्र आहे. तिने सिनेसृष्टी सोडली असली तरी तिने नवीन आवड जोपासली आहे. ती आता एक लेखिका आणि इंटेरिअर डिझायनर म्हणून सक्रिय आहे. तर अभिनेता अक्षयच्या कामाबाबत बोलायचं झालं तर तो शेवटचा 'अतरंगी रे' सिनेमात दिसला होता.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3rKrYTg