मुंबई- दरवर्षी अनेक लोकप्रिय बॉलिवूड अभिनेत्री विवाह बंधनात अडकतात. काहीनी त्यांच्या सह-कलाकारांशी लग्न केलं, तर काहीनी खेळाडूंशी लग्न केलं, तर काहीनी यशस्वी बिझनेसमनशी लग्न केलं आहे. नुकतच 'नगिन' फेम अभिनेत्री मौनी रॉय ही दुबईस्थित उद्योगपती सूरज नांबियारसोबत विवाह बंधनात अडकली आहे. मौनी रॉयच नाही तर या बॉलिवूड अभिनेत्रींनी ही एका यशस्वी उदयोगपतीशी लग्नं केलं आहे. मौनी रॉय - सूरज नांबियार २७ जानेवरील रोजी मौनी रॉयने दुबई मधील तिचा प्रियकर सुरज नांबियारशी गोव्यात लग्न केलं. लग्नाला फक्त त्यांच्या जवळचे मित्र आणि कुटुंबातील सदस्य उपस्थित होते. मल्याळी आणि बंगाली या दोन्ही पद्धतीत हा लग्न सोहळा पार पडला तर त्या आधी २६ जानेवारीला मौनीने हळद आणि मेहंदी समारंभही आयोजित केला होता. शिल्पा शेट्टी- राज कुंद्रा बॉलिवूडची अतिशय लोकप्रिय अभिनेत्री शिल्पा शेट्टीने २२ नोव्हेंबर २००९ रोजी प्रसिद्ध उद्योगपती राज कुंद्रासोबत लग्न गाठ बांधली. त्यांचं हे लग्न फार थाटामाटात पार पडलं होतं. त्यांना विआन आणि समिषा नावाची दोन मुलं आहेत. राजचं हे दुसरं लग्न आहे. असीन - राहुल शर्मा बॉलिवूड आणि दक्षिण चित्रपटांमध्ये लोकप्रिया अभिनेत्री असिनने २०१६ मध्ये राहुल शर्मासोबत लग्नं केलं. राहुल एका प्रसिद्ध भारतीय कंझ्युमर इलेक्ट्रॉनिक्स कंपनीचा सह-संस्थापक आहे. असीन हीने 'रेडी' या बॉलिवूड चित्रपटात सलमान खान सोबत काम केलं होतं. लग्नानंतर असीनने चित्रपटांपासून लांब राहण्याचा निर्णय घेतला. दोघांना अरिन नावाची मुलगी आहे. सोनम कूपर - आनंद आहुजा बॉलिवूडची फॅशन दिवा म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री म्हणजे सोनम कपूर. सोनमने चार वर्षांपूर्वी लंडनमधील बिझनेसमन आनंद आहुजासोबत लग्न केलं. आनंद आहुजा हा एका टॉप फॅशन ब्रँडचे मालक आहे. सोनमच्या लग्नाला जवळचे मित्र आणि कुटुंबातील लोकं उपस्थितीत होते. हा लग्न सोहळा सोनमच्या मुंबईतील घरात आयोजित करण्यात आला होता. ईशा देओल - भरत तख्तानी धर्मेंद्र आणि हेमा मालिनीची मुलगी ईशा देओलने तिचा बालपणीचा मित्रा भरत तख्तानी सोबत लग्न गाठ बांधली आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शाळा संपल्यानंतर १० वर्षे दोघे एकमेकांच्या संपर्कात नव्हते. पण नशिबाने ते पुन्हा एकत्र आले आणि २०१२ मध्ये त्यांचं लग्न झालं. ईशा आणि भरतला दोन मुली आहेत ज्यांचं नावं राध्या आणि मिराया आहे.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/1cuw9rN2B