Full Width(True/False)

आम्ही दोघंही... सनी कौशलसोबतच्या नात्यावर शर्वरी वाघचा मोठा खुलासा

मुंबई :बॉलिवूडच्या दुनियेत विविध सिनेमांसह कलाकारांच्या वैयक्तिक आयुष्याचीसुद्धा तितकीच चर्चा पाहायला मिळते. अभिनेत्री हिनं यंदा '' या सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. पण या पदार्पणापेक्षा शर्वरीच्या वैयक्तिक आयुष्याचीच चर्चा जास्त झाली. अभिनेता विकी कौशल याचा भाऊ अभिनेता याला शर्वरी डेट करत असल्याच्या बातम्या अलीकडे येत होत्या. विकी-कतरिनाच्या लग्नासाठी शर्वरी जेव्हा सवाई माधोपूरला पोहोचली आणि तेथून परतताना ती सनी कौशलबरोबर मुंबई विमानतळावर दिसली, तेव्हा त्यांच्या नात्याबद्दल आणखी बोललं गेलं. वाढलेल्या या चर्चेनंतर शर्वरी वाघ आता त्याविषयी व्यक्त झाली आहे. 'या सर्व अफवा आहेत. मी आणि सनी कौशल दोघंही गेल्या चार वर्षांपासून चांगले मित्र आहोत. सनी आणि माझ्या नात्याविषयी जे काही बोललं जातंय तीही एक अफवाच आहे', असं ती म्हणाली. दोन वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेल्या '' या वेब सीरिजमध्ये शर्वरी आणि सनीनं एकत्र काम केलं होतं. तेव्हापासून त्यांच्या 'खास मैत्री'विषयी बोललं जातंय. आता तर विकी-कतरिनाच्या लग्नाला ते जोडीनं उपस्थित राहिल्यापासून या चर्चेला उधाण आलं आहे.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3mQEOOd