मुंबई : 'आर्या २' या वेबसीरिजमुळे सुष्मिता सेन चर्चेत आली. या वेबसीरिजमधील तिच्या भूमिकेचे कौतुक होत आहे. सुष्मिताच्या कामाची चर्चा होत असतानाच तिचे आणि यांच्यातील नाते संपुष्टात आल्याची चर्चा सुरू झाली. रोहमन सुष्मिताच्या घरी तिच्या मुलींसोबत रहात होता. परंतु तो तिच्या घरातून बाहेर पडत मित्राकडे रहायला गेल्याने सुष्मितासोबतचे त्याचे रिलेशन संपुष्टात आल्याच्या बातमीवर शिक्कामोर्तब झाले. ही बातमी खरी असल्याचे समजल्यानंतर तिच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला. सुष्मिताने देखील रोहमनसोबत ब्रेकअप झाल्याची पोस्ट इन्स्टाग्रामवर शेअर केली. यापोस्टमध्ये तिने लिहिले होते की, 'शांतता खूपच सुंदर असते. आम्ही दोघांनी मित्र म्हणून नात्याला सुरुवात केली होती. आमच्यातील नाते जरी संपले तरी प्रेम कायम आहे...' रोहमन आणि सुष्मिता २०१८ मध्ये एकमेकांना डेट करायला सुरुवात केली. हे दोघे लिव इन रिलेशनमध्ये रहात होते. परंतु काही दिवसांपूर्वीच रोहमनने सुष्मिताचे घर सोडले आहे. अर्थात सुष्मिताचे ब्रेकअप होण्याची ही पहिलीच वेळ नाही. याही आधी तिचे अनेकजणांशी नाव जोडले गेले आहे. १९ नोव्हेंबर १९७५ मध्ये जन्मलेल्या सुष्मिताचे आतापर्यंत अनेक अफेअर्स झाली आहेत. अनेक जणांशी तिचे नाव जोडले गेले आहे. यामध्ये रणदीप हुडासोबतही तिचे नाव जोडले गेले होते. अर्थात या दोघांचे नाते फार काळ टिकले नाही आणि ते विभक्त झाले. सुष्मिताचे नाव दिग्दर्शक विक्रम भटसोबत जोडले गेले होते. 'दस्तक' सिनेमापासून या दोघांच्या अफेअरची चर्चा सुरू झाली होती विक्रम भटनंतर सुष्मिता सेनचे नाव हॉटेल व्यावसायिक संजय नारंग याच्यासोबत जोडले गेले होते. अनेक कार्यक्रमांत, पार्टींमध्ये हे दोघेजण एकत्र दिसून आले. अर्थात सुष्मिताने त्यांच्या या नात्यावर कोणतेही भाष्य कधीच केले नाही. सुष्मिताचे नाव उद्योगपती इम्तियाज खत्रीसोबतही जोडले गेले होते. हे दोघे अनेकदा एकत्र दिसले होते. इतकेच नाही तर पाकिस्तानी क्रिकेटपटू वसीम अक्रम सोबतही जोडले गेले होते. वसीम अक्रमसोबत तिने एका टीव्ही कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले होते. त्यानंतर हे दोघेजण एकमेकांना डेट करत असल्याच्या बातम्या समोर आल्या. अर्थात यावरही सुष्मिताने अथवा वसीमने कधीही त्यांच्या नात्यावर जाहीर भाष्य केले नाही. उद्योगपती रितीक भसीन याच्यासोबतही सुष्मिता सेन रिलेशनमध्ये होती. चार वर्षे हे दोघेजण रिलेशनमध्ये होते. या दोघांनीही त्यांच्या नात्यावर कधीही जाहीरपणे भाष्य केले नाही. सुष्मिता सेनचे नाव अनेकांसोबत जोडण्यात आले होते. परंतु सुष्मिताने कधीही तिच्या या नात्यांचा स्वीकार केला नव्हता. मात्र रोहन शॉलसोबतच्या नात्याचा स्वीकार सुष्मिताने जाहीरपणे केला होता.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3sOzj6t