Full Width(True/False)

राहुल द्रविड आहे मराठी मालिकेत झळकणाऱ्या अभिनेत्रीचा काका; तुम्ही ओळखलं का?

मुंबई: भारतीय संघातील 'द वॉल' असलेल्या राहुल द्रविडचा नुकताच वाढदिवस होता. त्याला सेलिब्रिटींनी तसंच त्याच्या चाहत्यांनीही सोशल मीडियाच्या माध्यमातून शुभेच्छा दिल्या. पण या सर्वात जास्त तर्चा होती ती, एका मराठी अभिनेत्रीनं दिलेल्या शुभेच्छांची. ‘’ या मालिकेतली इशा आठवतेय ना? या मालिकेमुळं घराघरात पोहोचलेली अभिनेत्री हिची पोस्ट सध्या व्हायरल होत आहे. ही पोस्ट तिनं राहुल द्रविडला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी शेअर केली होती. या पोस्टमध्ये तिनं राहुल द्रविदसोबतचा एक फोटोही चाहत्यासोबत शेअर केलाय. विशेष म्हणजे दोघंही एकाचं घरातील असून एकमेकांचे नातेवाईक असल्याचं तिनं म्हटलं आहे. 'आपण एकाच कुटुंबाचा भाग असल्याचा मला प्रचंड अभिमान आहे. मला आपलं आडनावही खूप आवडतो. मी हे कधीच बदलणार नाही.खूप प्रेम आणि आदर' असंआदितीनं तिच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. तर तुझं आणि यांच्यात काय नातं आहे? असा प्रश्न अनेकांनी तिला विचारला. यावरही तिनं उत्तर दिलं आहे. राहुल द्रविड तिचा काका आहे , असं तिनं म्हटलं आहे. आदितीच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर ती सध्या, 'सुंदरा मनामध्ये भरली' या मालिकेत नंदिनी ही व्यक्तिरेखा साकारतेय. तर दोन वर्षांपूर्वी आलेली ' ' ही शॉर्ट फिल्मही ् गाजली होती. पॅरिस फिक्टिव्हा फेस्टिव्हलमध्ये निवड झालेली भारतातली ही एकमेव शॉर्ट फिल्म आहे. लघुपटाची संपूर्ण संकल्पना आदिती द्रविडची आहे. सीमेवर लढताना धारातीर्थी पडलेल्या सैनिकांच्या वीरपत्नींची कथा 'वीरांगणा' सांगते. या लघुपटात आदितीनं एका सैनिकाच्या वीरपत्नीची भूमिका साकारली आहे.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3tsrWCa