मुंबई : बॉलिवूडचा दबंग खान अर्थात याने गुरुवारी त्याच्या सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. सोशल मीडियावर सलमान खान इतर कलाकारांच्या तुलनेत फार सक्रीय नसतो. परंतु सलमानची पोस्ट आहे, म्हटल्यावर त्याच्या चाहत्यांनी आतुरतेने पोस्ट वाचली. पण आपल्या लाडक्या अभिनेत्याला नेमके काय म्हणायचे आहे, हेच त्यांना कळले नाही... काय आहे सलमानची पोस्ट सलमान खानने त्याच्या सोशल मीडिया अंकाऊंटवरून एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टसोबत त्याने डोक्याला मुंडासे बांधलेला फोटोही शेअर केला आहे. या पोस्टमध्ये सलमानने लिहिले आहे की, 'मी जाहिराती, सिनेमाचे ट्रेलर पोस्ट करत असतो... आपलाच ब्रँड आहे ना..समजले काय? मी सगळे काही ऐकत आहे...मी तुम्हाला देखील बघत आहे...मी तुम्हाला ऐकतही आहे... आज एक पोस्ट उद्या टीझर...' सलमानची ही पोस्ट पाहून त्याचे चाहते चक्रावून गेले आहेत. आपल्या लाडक्या भाईजानला नेमके काय म्हणायचे आहे, याचा अंदाज कॉमेन्टसमधून ते वर्तवू लागले आहेत. काही चाहत्यांनी सलमानाच्या आगामी 'टायगर ३' सिनेमाचा टीझर असावा असा अंदाज व्यक्त केला आहे. तर काहींना तो त्याच्या कामाच्या कराराबाबत सांगत असेल, असे म्हटले आहे. सलमानच्या एका चाहत्याने लिहिले आहे की, 'भाई नेमके काय म्हणायचे आहे तुम्हाला?' तर आणखी एका चाहत्याने लिहिले आहे, 'भाई काहीच समजले नाही पण वाचून चांगले वाटले...' सलमानच्या कामाबद्दल सांगायचे तर त्याचा टायगर ३ हा सिनेमा लवकरच प्रदर्शित होणार आहे. या सिनेमात त्याच्यासोबत कतरीना कैफ आणि इ्म्रान हाश्मी दिसणार आहेत. त्याशिवाय आमिर खानच्या लाल सिंह चढ्ढा आणि शाहरुख खानच्या पठाण सिनेमात तो पाहुणा कलाकार म्हणून दिसणार आहे. अंतिमः द फायनल ट्रूथ या सिनेमात सलमान आणि त्याचा मेहुणा आयुष शर्मासह दिसला होता.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3KxjG9M