नवी दिल्ली : आपल्या युजर्सना उत्कृष्ट अनुभव देण्यासाठी आणि त्याच्या किंमतीसाठी खूप लोकप्रिय आहे. ज्यामुळे लोक त्याकडे आकर्षित होतात. पण, फोनची बॅटरी झपाट्याने संपल्याने अनेक वेळा लोक चिंतेत देखील असतात. यामुळे फोन पुन्हा-पुन्हा चार्ज करावा लागतो. मात्र आता त्याची काळजी करण्याची गरज नाही. आज आम्ही तुम्हाला काही ट्रिक्स सांगणारआहोत. ज्या तुमच्या iPhone ची बॅटरी लाईफ वाढवण्यासाठी मदत करतील. वाचा: लोकेशन सर्व्हिस: तुमच्या फोनच्या लोकेशन सर्व्हिसमुळे फोनची बॅटरी लवकर संपते. म्हणून ते त्वरित बंद करण्याची आवश्यकता आहे. यासाठी तुम्हाला तुमच्या अॅपल डिव्हाईसवरील सेटिंग्ज मेनूमध्ये जाऊन लोकेशन सर्व्हिसेस बंद कराव्या लागतील. लो पॉवर मोड: तुम्ही iPhone किंवा iPad च्या बॅटरीचे आयुष्य वाढवण्यासाठी लो पॉवर मोड सुरु करू शकता. असे केल्याने, फोनची इतर कामं किंवा Background Activities Disable केले जातात. ते करण्यासाठी, सेटिंग्जवर जा आणि बॅटरीवर क्लिक करा नंतर लो पॉवर मोड इनेबल करा. स्क्रीन ब्राइटनेस: खूप जास्त स्क्रीन ब्राइटनेस वापरण्याची अनेकांना सवय असते, पण यामुळेच तुमच्या फोनची बॅटरी लवकर संपते. तुम्ही हे टाळले पाहिजे. ब्राइटनेस कमी करा किंवा ऑटो-ब्राइटनेस इनेबल करा. राईज टु वेक बंद करा: बॅटरी ड्रेन होण्यामागे राईज टु वेक हे फीचर देखील कारणीभूत असू शकते. हे मुख्यतः iPhone वर डीफॉल्ट इनेबल असते. ते बंद करण्यासाठी तुम्हाला तुमच्या iOS डिव्हाइसवरील सेटिंग्जमध्ये जावे लागेल आणि त्यानंतर तुम्ही डिस्प्ले आणि ब्राइटनेस अंतर्गत नेव्हिगेट करू शकता. ब्लूटूथ, वायफाय आणि एअरड्रॉप: वायफाय हे एक वैशिष्ट्य आहे. जे, बॅटरी खूप जलद संपवते. WiFi, Bluetooth सह, AirDrop चालू असताना ते सतत कनेक्शन शोधते. म्हणून, ते वापरात नसताना ते बंद करणे चांगले. वाचा वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3fHlgbh