मुंबई:'' या प्रेक्षकांच्या आवडत्या मालिकेतील कृष्णा म्हणजेच अभिनेत्री श्वेता खरात तरुणांच्या गळ्यातील ताईत बनली आहे. साधेपणातच सौंदर्य आहे हे कृष्णा या भूमिकेकडे पाहून कळतं. पण कृष्णाची भूमिका साकारणारी श्वेता खऱ्या आयुष्यात खूपच स्टायलिश आहे आणि तिचं हे रूपदेखील चाहत्यांना खूप आवडतं. सध्या तिचे स्टायलिश फोटो सोशल मीडियावर बरेच व्हायरल झाले आहेत. तिच्या या स्टाइलबद्दल ती म्हणाली, 'मला स्वतःला सोयीचे वाटतील असे कपडे परिधान करायला आवडतात मग ते पारंपरिक असोत किंवा पाश्चात्य. सगळ्या रंगांचे कपडे आपण घातले पाहिजे. मला पेस्टल रंग खूप आवडतात. सगळ्या रंगांबरोबर मी प्रयोग करते आणि म्हणूनच कदाचित माझी स्टाइल चाहत्यांना आवडते. हॉलिवूडमध्ये मी , , यांना फॅशन आयकॉन म्हणून बघते. तर बॉलिवूडमध्ये दीपिका, प्रियंका चोप्रा या अभिनेत्री आणि ब्लॉगर कोमल पांडे यांना मी फॉलो करते. त्यांच्या स्टाइलमधून मला प्रेरणा मिळते.'
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3nhDHHq