Airtel XStream ३५० Mbps स्पीड असलेल्या Jio Fiber, BSNL, ACT युजर्ससाठी १५०० रुपयांपेक्षा कमी ब्रॉडबँड प्लान्स ऑफर करते. जे युजर्स घरून काम करत आहेत, किंवा अभ्यास करत आहेत, स्ट्रीमिंग शो किंवा गेमिंग करत आहेत, त्यांच्यासाठी या योजना उपयुक्त ठरू शकतात.१४९९ रुपयांच्या ब्रॉडबँड प्लान मध्ये विविध स्ट्रीमिंग फायदे देखील उपलब्ध आहेत. ऑक्टोबर २०२१ मधील TRAI डेटानुसार, शीर्ष ५ नेटवर्क प्रदाते रिलायन्स जिओ, भारती एअरटेल, व्होडाफोन आयडिया, BSNL आणि एट्रिया कन्व्हर्जन्स आहेत. या कंपन्यांचा एकूण ब्रॉडबँड ग्राहकांपैकी ९८.६९ टक्के बाजार हिस्सा आहे. Jio कडे ४३०.७५ दशलक्ष, Airtel २०८.७१ दशलक्ष, Vodafone Idea १२२.४७ दशलक्ष, BSNL २४. ५७ दशलक्ष आणि ACT १.९७ दशलक्ष होते.जाणून घ्या या प्लान्समध्ये मिळणाऱ्या बेनिफिट्सविषयी सविस्तर आणि ठरवा तुम्हाला कोणता खरेदी करायचंय ते.

BSNL
BSNL चा १४९९ रुपयांचा ब्रॉडबँड प्लान : BSNL चा १४९९ रुपयांचा ब्रॉडबँड प्लान ग्राहकांना ३०० Mbps स्पीडसह ४ TB किंवा ४००० GB पर्यंत डेटा ऑफर करतो. त्याच वेळी, एकदा FUP मर्यादा गाठली की, इंटरनेटचा वेग ४ Mbps पर्यंत कमी होतो. BSNL च्या १४९९ रुपयांच्या ब्रॉडबँड या प्लॅनमध्ये अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग देखील देण्यात आले आहे. इतर फायद्यांप्रमाणे, या प्लाननमध्ये Disney + Hotstar ची मोफत प्रीमियम मेंबरशिप देखील दिली आहे. प्रत्येक प्रकारच्या युजर्ससाठी हा एक चांगला पर्याय ठरू शकतो..
MTNL
MTNL चा १५०० रुपयांचा ब्रॉडबँड प्लान : MTNL चा १५०० रुपयांचा ब्रॉडबँड प्लान ५० Mbps स्पीडसह ६५० GB पर्यंत डेटा ऑफर करतो. इतर फायद्यांबद्दल बोलायचे झाल्यास, यामध्ये ५०० मोफत घरगुती कॉल्स दिले जातात. त्याच किंमतीच्या दुसऱ्या ब्रॉडबँड प्लानमध्ये १०० एमबीपीएस स्पीडसह ५५० GB पर्यंत डेटा दिला जातो.
ACT चा १४२५ रुपयांचा ब्रॉडबँड प्लान
: ACT च्या १४२५ ब्रॉडबँड प्लान मध्ये ३५० Mbps स्पीडसह अनलिमिटेड डेटा प्रदान केला जातो. स्ट्रीमिंग फायद्यांबद्दल बोलायचे झाल्यास, Zee5 प्रीमियम, हंगामा, Sony Liv, Aha, Epic On, Act Shield आणि Cult Fit या प्लान चे सदस्यत्व घेतले आहे.
Jio Fiber
JioFiber १४९९ रुपयांचा चा ब्रॉडबँड प्लान : हा JioFiber चा टॉप-टियर ब्रॉडबँड प्लान आहे. या प्लानच्या फायद्यांबद्दल बोलायचे झाल्यास, ३०० Mbps पर्यंत डाउनलोड आणि अपलोड स्पीडसह अमर्यादित इंटरनेट प्रदान केले जाते. व्हॉईस कॉलिंगबद्दल बोलायचे झाले तर या प्लानमध्ये अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग देण्यात आले आहे. यासोबतच यामध्ये १५ OTT अॅप्सचे मोफत सबस्क्रिप्शन कोणत्याही अतिरिक्त शुल्काशिवाय दिले जाते. इतर फायद्यांसाठी, हा हा प्लान Netflix, Disney + Hotstar, Amazon Prime, Sony Liv आणि Eros Now यासह इतर अॅप्समध्ये प्रवेश देते.
Airtel XStream
Airtel XStream चा १४९९ रुपयांचा प्लान : Airtel XStream अल्ट्रा-ब्रॉडबँड प्लानमध्ये ग्राहकांना ३०० Mbps च्या स्पीडसह अनलिमिटेड इंटरनेट प्रदान केले जाते. या प्लानमध्ये अनलिमिटेड लोकल आणि एसटीडी कॉलिंग दिले जाते. इतर फायद्यांबद्दल सांगायचे तर, Airtel XStream चा १४९९ रुपयांच्या प्लानमध्ये Amazon Prime, Wynk Music आणि Shaw Academy चे सबस्क्रिप्शन दिले आहे. ग्राहकांसाठी हा एक बेस्ट पर्याय ठरू शकतो. एकूणच वर्क फ्रॉम होम आणि ऑनलाईन क्लासेस दोन्हीसाठी हाप्लान चांगला ठरू शकतो.
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3FbolKO