नवी दिल्ली: इंस्टंट WhatsApp चा वापर करणाऱ्या यूजर्सची संख्या मोठी आहे. अ‍ॅपच्या माध्यमातून चॅटिंगपासून ते व्हिडिओ कॉल करता येतो. मात्र, या अ‍ॅपचा वापर चुकीच्या कामासाठी देखील केला जातो. तुम्ही देखील वापरत असाल तर काही गोष्टींची काळजी घेणे गरजेचे आहे, अन्यथा जेलची हवा खायला लागू शकते. वाचा: व्हॉट्सअ‍ॅपच्या माध्यमातून चुकीच्या गोष्टींना प्रोत्साहन देणे टाळावे. तसेच, अश्लील सामग्री शेअर करणे टाळावे. कारवाई होण्यापासून वाचण्यासाठी व्हॉट्सअ‍ॅप यूजरने कोणत्या गोष्टी करू नयेत, त्याविषयी सविस्तर जाणून घेऊया. WhatsApp वर या गोष्टी करणे टाळा
  • कोणताही ग्रुप मेंबर बेकायदेशीर गोष्टींना प्रोत्साहन देत असल्यास ला ट्रॅक करून कारवाई केली जाऊ शकते.
  • चुकूनही वर अश्लील क्लिप, चाइल्ड पोर्न, इमेज अथवा अश्लील कंटेंट शेअर करू नये.
  • एखाद्या महिलेने व्हॉट्सअ‍ॅपवर छेड काढत असल्याची तक्रार केल्यास अशा स्थितीत पोलीस अटक करू शकतात.
  • WhatsApp ग्रुपवरील एखादा सदस्य छेडछाड अथवा एडिट केलेले फोटो-व्हिडिओ शेअर करत असल्यास त्याला अटक होऊ शकते.
  • कोणत्याही धार्मिक स्थळाचे नुकसान करण्यासाठी द्वेषपूर्ण मेसेज WhatsApp वर पसरवल्यास देखील कारवाई होऊ शकते.
  • एखाद्या दुसऱ्या व्यक्तीच्या नावाने व्हाट्सएप अकाउंट उघडून चुकीच्या कामासाठी वापर करणे देखील महागात पडू शकते.
  • हिडन कॅमेऱ्याने काढण्यात आलेले अश्लील व्हिडिओ शेअर करणे देखील चुकीचे असून, असे केल्यास तुम्हाला अटक होऊ शकते.
  • WhatsApp च्या माध्यमातून ड्रग्स अथवा अन्य प्रतिबंधित वस्तूंची विक्री केल्यास पोलीस कारवाई करू शकतात.
वाचा: वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/33rcs6I