Full Width(True/False)

अभिनेता Gaspard Ulliel चा स्कीइंग अपघातात मृत्यू

अनेक चित्रपट आणि टीव्ही कार्यक्रमांचा एक भाग असलेला अभिनेता चा स्कीइंग अपघातात मृत्यू झाला. ३७ वर्षीय गॅस्पर्डची 'हॅनिबल रायझिंग' मधील भूमिकेची खूप चर्चा झाली होती. अनेक जाहिरातींचाही तो भाग होता. Gaspard Ulliel मार्वल्सची आगामी सीरिज 'मून नाइट' मध्ये देखील दिसणार होता. त्यांच्या निधनाने हॉलिवूडला मोठा धक्का बसला आहे. अल्बर्टविलेच्या वकिलाने सांगितले की ही घटना मंगळवारी घडली. स्कीइंग करताना गॅस्पर्डची दुसऱ्या स्कीयरशी टक्कर झाली. धडकल्यानंतर दोघेही जमिनीवर कोसळले. त्यांच्या मदतीसाठी बचाव पथक तातडीने पोहोचले. मात्र गॅस्पर्डमध्ये काहीच हालचाल होत नसल्याचे आणि तो बेशुद्ध अवस्थेत पडल्याचे टीमने पाहिल्यानंतर एकच खळबळ उडाली. नंतर टीमने गॅस्पर्डचं निधन झाल्याचं सांगितलं. स्कीइंग करताना गॅस्पर्डची ज्याच्याशी टक्कर झाली, त्याला कोणतीही दुखापत झाली नाही. La Rosiere resort च्या संचालकाने बीएफएम टीव्हीला सांगितले की स्कीइंग करताना गॅस्पर्डने हेल्मेट घातले नव्हते. फ्रेंच स्कीइंग स्लोपवर हेल्मेट आवश्यक नसले तरी प्रत्येकाला ते परिधान करण्याची सूचना दिली जाते.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3rxB8CG