Full Width(True/False)

Prepaid Plans: Jio, Vodafone Idea चा सर्वात स्वस्त प्लान, १५० रुपयांपेक्षा कमी किंमतीत मिळेल डेटा-कॉलिंगसह अनेक फायदे

नवी दिल्ली : टेलिकॉम कंपन्या आणि वोडाफोन आयडियाने १ डिसेंबर २०२१ ला आपल्या प्रीपेड प्लान्सच्या किंमती वाढवल्या होत्या. त्यानंतर या दोन्ही कंपन्यांच्या सर्वात स्वस्त रिचार्ज प्लानची किंमत १४९ रुपये आहे. या प्लानमध्ये ग्राहकांना अनलिमिटेड डेटा, मोफत कॉलिंगची सुविधा मिळते. वाचा: वीआय आणि रिलायन्स जिओच्या १४९ रुपयांच्या प्लानची तुलना करणार आहोत. जेणेकरून, कोणत्या प्लानमध्ये सर्वाधिक बेनिफिट्स मिळतात हे लक्षात येईल. या प्लान्सविषयी जाणून घेऊया. चा १४९ रुपयांचा प्लान रिलायन्स जिओच्या १४९ रुपयांच्या प्लानची वैधता २० दिवस आहे. यामद्ये यूजर्सला दररोज १ जीबी डेटा याप्रमाणे एकूण २० जीबी डेटा मिळतो. याशिवाय कोणत्याही नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंग आणि दररोज १०० एसएमएसची सुविधा मिळते. तसेच, Jio TV, JioCinema, Jio Security आणि JioCloud चे मोफत सबस्क्रिप्शन दिले जात आहे. चा १४९ रुपयांचा प्लान Vodafone Idea च्या १४९ रुपयांच्या प्लानची वैधता २१ दिवस आहे. प्लानमध्ये यूजर्सला एकूण १ जीबी डेटा मिळतो. याशिवाय अनलिमिटेडची सुविधा मिळते. मात्र, मोफत एसएमएस मिळत नाहीत. कोणाचा प्लान सर्वोत्तम? आणि जिओच्या प्लान्सची किंमत समान असली तरी यात मिळणाऱ्या बेनिफिट्समध्ये मोठा फरक आहे. जिओच्या प्लानमध्ये दररोज १ जीबी डेटा दिला जात आहे, तर वीआयच्या प्लानमध्ये संपूर्ण कालावधीसाठी केवळ १ जीबी डेटा मिळतो. वैधतेबद्दल सांगायचे तर वीआयच्या प्लानमध्ये १ दिवस जास्त वैधता मिळते. जर तुम्हाला एसएमएससह येणारा प्लान हवा असल्यास जिओची निवड करू शकता. कारण वीआयच्या प्लानमध्ये मोफत एसएमएस मिळत नाहीत. वाचा: वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3nJlgf0