मुंबई : पियुष मिश्रा, एक उत्तम अभिनेता, एक अप्रतिम गायक, एक अप्रतिम दिग्दर्शक आणि याहून सर्वांपेक्षा काकणभर जास्त उत्कृष्ट कवी आहेत. ही एक अशी व्यक्ती आहे ज्यांनी त्या भावनांना अक्षरं दिली, जी तुम्हा आम्हाला सांगावशी वाटतात पण शब्दात मांडता येत नाही. यांचा जन्म १३ जानेवारी १९६३ रोजी ग्वाल्हेर, मध्य प्रदेश येथे झाला. कुटुंब मध्यमवर्गीय होतं. स्वप्न पडली आणि मग ती पूर्ण करण्यासाठी खूप संघर्ष केला. आर्थिक परिस्थिती चांगली नसल्याने संपूर्ण कुटुंब काकू तारादेवी मिश्रा यांच्या घरी जाऊन राहू लागले. मावशीला मूलबाळ नव्हते. त्यांनी पियुषला आपला मुलगा मानले. पियुष यांचं नाव आधी प्रियांक शर्मा होते, मात्र ते दहावीत शिकत असताना त्यांचे नाव बदलून पियुष मिश्रा ठेवण्यात आले. पीयूष यांनी १९८३ ते १९८६ या काळात नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामधून पदवी प्राप्त केली. दारू, लग्न आणि मग शब्दांतून व्यक्त होऊ लागले. पियुष यांनी २० वर्ष दिल्लीत राहून नाटकांत काम केले. १९९५ मध्ये त्यांनी आर्किटेक्ट प्रिया नारायण यांच्याशी लग्न केले. लग्न झाल्यानंतर पियुष यांना दारूचे व्यसन लागले. त्यांचे व्यसन दिवसागणिक वाढत गेल्याने त्यांचे कुटुंब खूपच त्रस्त झाले होते. पियुष यांनी एका मुलाखतीत सांगितले की, दारू हे केवळ एक निमित्त होते. वास्तवात नैतिकदृष्ट्याही त्यांचे पतन झाले होते. बायको-मुलांची चिंता नव्हती. परंतु परिस्थिती बदलली. पियुष यांचे विचारही बदलले आणि त्यांनी मनाचा आवाज ऐकून ते शब्दरुपात मांडायला सुरुवात केली. त्यातूनच त्यांच्यातील शायर जन्माला आला. त्यांनी लिहिलेल्या शायरी सर्वसामान्य माणसाच्या भावना नेमकेपणाने मांडणाऱ्या होत्या. त्यामुळे त्यांच्या शायरीला लोकमान्यता मिळू लागली. अशाच त्यांच्या लोकप्रिय झालेल्या १० शायरी. या शायरी वाचून आपण अंतर्मुख होऊन विचार करायला लागतो आणि नकळतपणे अशाच भावना आपल्या मनातही आहेत, अशी जाणीव होते. १. "अजीब दस्तूर है मोहब्बत का, रुठ कोई जाता है, टूट कोई जाता है।" २. "इलाइची के दानों सा मुकद्दर है अपना, महक उतनी ही बिखरी पीसे गए जितना।" ३. "शुक्र करो कि हम दर्द सहते हैं, लिखते नहीं, वरना कागजों पर लफ्जों के जनाजे उठते।" ४. "कैसे करें हम खुद को तेरे प्यार के काबिल, जब हम आदतें बदलते हैं, तुम शर्तें बदल देती हो।" ५. "औकात नहीं थी जमाने में जो मेरी कीमत लगा सके, कमबख्त इश्क में क्या गिरे, मुफ्त में नीलाम हो गए।" ६. "आज मैंने फिर जज्बात भेजे, आज तुमने फिर अल्फाज ही समझे।" ७. "ख्वाहिशों को जेब में रखकर निकला कीजिए जनाब, खर्चा बहुत होता है मंजिलों को पाने में।" ८. "न जाने कब खर्च हो गए पता ही नहीं चला, वो लम्हे जो छुपाकर रखे थे जीने के लिए।" ९. "दर्द की बारिश में हम अकेले ही थे, जब बरसीं खुशियां, ना जाने भीड़ कहां से आ गई।" १०. "हल्की-फुल्की सी है जिंदगी, बोझ तो केवल ख्वाहिशों का है।"
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3tq1Csc