Full Width(True/False)

तेव्हाअक्षय एकाच वेळी तीन मुलींसोबत... रवीना टंडननं केला धक्कादायक खुलासा

मुंबई: खिलाडी कुमार म्हणजे अभिनेता बॉलिवूडमधला सर्वात जास्त चित्रपट करणारा अभिनेता आहे. सुरूवातीच्या काळात जेव्हा अक्षयने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं तेव्हा त्याच नाव अनेक लोकप्रिय अभिनेत्रींशी जोडलं गेलं. या यादीत अभिनेत्री रवीना टंडनचं नाव देखील सामील आहे. इतकंच नाही तर त्या दोघांनी मंदिरात जाऊन गुपचुप लग्न केलं होतं, असंही म्हटलं जातं. मात्र नंतर त्यांच्या ब्रेकअपची बातम्या आल्या.. रवीनाने एका मुलाखतीत त्यांचा ब्रेकअप का झाला या मागचं कारण संगितलं होतं. दिलेल्या मुलाखतीत रवीनाने तिचा साखरपुडा मोडण्यामागचं कारण सांगितलं आहे. ती म्हणाली, 'माझा साखरपुडा माझ्या ओळखीच्या व्यक्तीशी झाला होता. हा निर्णय अगदी विचार करून घेतला होता. माझी फार काही अपेक्षा नव्हती. मला सामान्य जीवन जगायचं होतं आणि म्हणून मी लग्नाआधीच काम सोडण्याचा निर्णय घेतला होता. मला वाटलं होतं की आम्ही शूटच्या शेवटच्या दिवशी लग्न करू पण तसं झाले नाही. मग मी पुन्हा कामाला सुरूवात केली, तेव्हा त्यानं मला पुन्हा काम सोडायला सांगितलं आणि आपण लग्न करु असं म्हटला. मात्र यावेळी मी त्याला ठामपणे सांगितलं की मी एकदा माझे करिअर न निवडता तुझी निवड केली, पण आता मी माझ्या करिअरची निवड करत आहे. रवीनानं पुढे सांगितलं, 'साखरपुडा मोठ्या थाटामाटात आणि पारंपरिक पद्धतीत पार पडला. दोघांचे कुटुंबिय दिल्लीहून आले होते. त्यांच्या कुटुंबातील मोठ्यांनी आशिर्वाद म्हणून लाल ओढणी दिली होती. त्यामुळं सगळ्यांना वाटलं की माझं लग्न झालं.टअक्षयने देखील रेडिफ’ला दिलेल्या मुलाखतीत कबूल केलं होत की त्याच लग्न नाही फक्त साखरपुडा झाला होता. मोहर चित्रपटानंतर पडले प्रेमात ९०च्या दशकात रवीना आणि अक्षय यांच्या अफेअरच्या जोरदार चर्चा सुरू होत्या. दोघांचही करिअर टॉपलं होतं. त्यांची ही रुपेरी पडद्यावरची जोडी पडद्यामागे म्हणजेच खऱ्या आयुष्यात ही चाहत्यांच्या पसंतीस उतरलीही होती. त्यांच्या लव्ह स्टोरीला खरी सुरूवात 'मोहर' या चित्रपटानंतर झाली. अक्षय आणि रवीना दोघेही पंजाबी असल्यामुळं त्यांच्या आवडी निवडी सारख्या होत्या. हे होत साखरपुडा मोडण्या मागचे कारण रवीनाने एका मुलाखतीत सांगितलं होते की, अक्षय एकावेळी तीन मुलींना डेट करत असे. त्यानं रवीनाला लग्न करण्याचं आश्वासनही दिले होतं. मात्र नंतर अक्षयच्या अफेअरच्या बातमीने नाराज होऊन तिनं हे नातं तोडलं. अशा चर्चा होत्या की रवीना सोबत रिलेशनशिपमध्ये असताना अक्षय शिल्पा शेट्टीला डेट करत होता. रवीनाच्या कामाबाबत बोलल्याचं झालं तर तिनं 'अर्यनक' या सीरिजद्वारे डिजिटल प्लॅटफॉर्मवर पदार्पण केलं. तिच्या या वेब सीरिजला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळताना दिसत आहे.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3K9ZsD9