Full Width(True/False)

Happy New Year 2022: WhatsApp वर असे डाउनलोड आणि सेंड करा New Year स्टिकर्स, पाहा प्रोसेस

नवी दिल्लीः 2022: आजपासून नवीन वर्षाला सुरुवात झाली आहे. आज नवीन वर्षाचा पहिलाच दिवस आहे. जगभरात करोनाचे सावट असल्याने नवीन वर्ष घरात राहून सेलिब्रेट करणे हे फायद्याचे आहे. तसेच आज नववर्षाच्या पहिल्याच दिवशी आपल्या मित्र-मैत्रिणींना व्हाट्सअॅपवरून शुभेच्छा देऊ शकता. व्हाट्सअॅपवर फक्त टेक्स्ट किंवा इमेजच्या जागी स्टिकर वरून आपल्या मित्रांना शुभेच्छा देऊ शकतात. व्हाट्सअॅप स्टिकर्स खूपच मजेदार असतात. यामुळे नवीन वर्षात नवीन पद्धतीने शुभेच्छा देऊ शकतात. या ठिकाणी व्हाट्सअॅपवर स्टिकर पाठवण्याची संपूर्ण प्रक्रिया आम्ही तु्म्हाला सांगत आहोत. इंस्टेट मेसेजिंग प्लॅटफॉर्म व्हाट्सअॅपसाठी तुम्हाला न्यू ईयर स्टिकर्स सहज मिळतील. याला तुम्ही गुगल प्ले स्टोर वरून डाउनलोड करू शकतात. हे खूपच सोपे आहे. तुम्हाला सर्वात आधी आपल्या अँड्रॉयड फोनमध्ये गुगल प्ले स्टोर ओपन करावे लागेल. यानंतर तुम्हाला सर्च बार मध्ये सर्च करावे लागेल. यानंतर प्ले स्टोरवर तुम्हाला अनेक वेगवेगळे स्टिकर्स पॅक दिसेल. याला डाउनलोड करण्याआधी तुम्ही रेटिंग जरूर पाहा. यानंतर आपले पसंतीच्या स्टिकर्स पॅकला डाउनलोड करा. स्टिकर्स पॅक डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला व्हाट्सअॅप ओपन करावे लागेल. या ठिकाणी पर्सनल चॅट ग्रुपला ओपन करावे लागेल. यावरून तुम्ही नवीन वर्षाचे स्टिकर्स पाठवू शकतात. यासाठी तुम्हाला इमोजी ऑप्शन सिलेक्ट करावे लागेल. येथून तुम्हाला स्टिकर सेक्शन मध्ये जावे लागेल. या ठिकाणी तुम्हाला डाउनलोड करण्यात आलेले स्टिकर्स पॅक दिसतील. तुम्ही स्टिकर्स पॅकच्या हेडरला सिलेक्ट करून त्यात उपलब्ध असलेले स्टिकर्स पाहू शकतात. त्यानंतर त्याला शेअर करायचे असेल तर त्या स्टिकरवर टॅप करा. स्टिकर तुम्हाला चॅट मध्ये शेअर होतील. वाचा: वाचा: वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/31iCcBe