मुंबई- बॉलीवूडच्या सर्वाधिक चर्चेत असलेल्या कपल्सबद्दल बोलायचं झालं तर आणि अग्रणीच असतील. मात्र, सध्या दोघांच्या दुराव्याचं कारण झाला आहे. त्याचं झालं असं की काही दिवसांपूर्वी अर्जुन कपूर करोना पॉझिटिव्ह असल्याचं कळलं. यानंतर मलायकाचीही चाचणी करण्यात आली असता तिचा रिपोर्ट निगेटिव्ह आला. त्यामुळे अर्जुनला घरीच क्वारन्टाइन करण्यात आलं असून तो मलायकाला भेटू शकत नाही. नवीन वर्षांचं स्वागत दोघांनीही वेगवेगळं राहूनच केलं. या दरम्यान मलायकाने स्वतःचा आणि अर्जुनचा एक जुना फोटो शेअर केला. ज्यात दोघंही पाउट करताना दिसत आहेत. या फोटोला कॅप्शन देताना मलायकाने लिहिले की, 'मी तुला खूप मिस करत आहे मिस्टर पॉउटी अर्जुन कपूर (खरं तर माझं पाउट तुझ्यापेक्षा जास्त चांगलं आहं.) नवीन वर्षाच्या शुभेच्छा.' इथे पाहा मलायकाची पोस्ट - अर्जुन कपूर, त्याची बहीण अंशुला कपूर, चुलत बहीण रिया कपूर आणि मेहुणा करण बुलानी हे अलीकडेच कोविड पॉझिटिव्ह असल्याचं आढळून आले. यानंतर मलायकाची कोविड चाचणी करण्यात आली होती पण त्यात ती निगेटिव्ह आली. सध्या अर्जुन, रिया, अंशुला आणि करण बुलानी यांना घरातच क्वारन्टाइन ठेवण्यात आलं आहे.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3G0tSW1