Full Width(True/False)

Laptop Offers : नॉर्मल लॅपटॉपच्या किमतीत मिळतोय Apple Mac Book Air, ऑफर खास विद्यार्थांसाठी, पाहा डिटेल्स

नवी दिल्ली: लॅपटॉपची भारतात प्रचंड क्रेझ आहे. कारण, तो प्रीमियम लॅपटॉप आहे. तसेच, त्यात मजबूत फीचर्स देण्यात आले आहेत. जे युजर्सच्या गरजेनुसार डिझाइन केले गेले आहे. आता लॅपटॉप वरील उपलब्ध ऑफर्समुळे हा लॅपटॉप खरेदी करणे आता खूप सोपे झाले असून विद्यार्थ्यांसाठी यावर जोरदार सूट दिली जात आहे. विद्यार्थी ऍपल मॅकबुक एअर सामान्य लॅपटॉपच्या किमतीत खरेदी करू शकतात आणि त्यावर त्यांचे काम करू शकतात. जाणून घ्या या ऑफर्स विषयी. वाचा: Apple च्या प्रीमियम रिसेलर वेबसाइटवर ऑफर: जर तुम्हाला MacBook Air खूप कमी किमतीत खरेदी करायचा असेल तर तुम्ही Apple च्या प्रीमियम रिसेलर पोर्टलला भेट देऊ शकता. येथे Macbook Air वर १३ टक्के सवलत मिळत आहे, जी विद्यार्थ्यांसाठीच आहे. तुम्ही त्यावर बँक ऑफरचाही लाभ घेऊ शकता, ज्यामध्ये मोठ्या बचतीला वाव आहे. Apple MacBook Air किती रुपयांमध्ये मिळत आहे? मॅकबुक एअरच्या m1 256 gb मॉडेलची MRP ९२९०० रुपये आहे. परंतु, सर्वप्रथम, यावर १३ टक्के शैक्षणिक सवलत मिळत आहे. जी १२,०७७ रुपयांची आहे, त्यानंतर यावर ६००० रुपयांचा चा कॅशबॅक ऑफर केला जात आहे. सर्व ऑफर्स दिल्यानंतर विद्यार्थ्यांना या लॅपटॉपसाठी फक्त ७४,८२३ रुपये भरावे लागतील, जे सामान्य लॅपटॉपसारखेच आहे. ही ऑफर किती दिवस उपलब्ध असेल याबाबत कोणतीही माहिती उपलब्ध नाही. वाचा: वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/RcQaWyhG0