Full Width(True/False)

OnePlus 10 Pro Launch : OnePlus 10 Pro भारतात येण्यास सज्ज, फोन होतो ३२ मिनिटांत फुल चार्ज, पाहा ही नवीन माहिती

नवी दिल्ली: हँडसेट निर्माता OnePlus ने काही काळापूर्वी आपला सर्वात शक्तिशाली फोन चायनीज मार्केटमध्ये दाखल केला होता आणि आता समोर आलेल्या माहितीनुसार, हा OnePlus मोबाईल फोन लवकरच भारतीय बाजारात लाँच करण्यात येणार आहे. सध्या कंपनीने कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही. परंतु, अनेक सर्टिफिकेशन साइट्सवर हा फोन दिसला आहे. ज्यावरून OnePlus 10 Pro लवकरच भारतात येऊ शकतो असे सांगण्यात येत आहे. वाचा: याबाबत टिपस्टर मुकुल शर्माने दोन वेगवेगळे स्क्रीनशॉट शेअर केले आहेत. ज्यातील पहिला स्क्रीनशॉट पाहता हा फोटो कंपनीच्या अधिकृत सपोर्ट वेबसाइटवरून घेण्यात आला आहे. तर, दुसरा स्क्रीनशॉट सर्टिफिकेशन साइटचा असल्याचे दिसते. ज्यामध्ये NE2211 मॉडेल क्रमांकाचा उल्लेख आहे. काही काळापूर्वी OnePlus 10 Pro BIS म्हणजेच ब्यूरो ऑफ इंडियन स्टॅंडर्ड आणि ब्लूटूथ SIG प्रमाणपत्र साइटवर दिसला होता. सध्या, भारतात Oneplus 10 Pro लाँच तारखेबद्दल माहिती उपलब्ध झालेली नाही. (फोटो: ट्विटर/मुकुल शर्मा) OnePlus 10 Pro चे स्पेसिफिकेशन्स: डिस्प्ले: या OnePlus स्मार्टफोनमध्ये ६.७ -इंचाची QuadHD+ AMOLED स्क्रीन आहे जी १२० Hz रिफ्रेश दर देते. फोन कन्टेन्टनुसार १H z-१२० Hz पासून रिफ्रेश दर अड्जस्ट करतो. प्रोसेसर: स्नॅपड्रॅगन 8 Gen 1 प्रोसेसर स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी वापरला गेला आहे. १२ GB पर्यंत LPDDR5 RAM आणि 256GB (UFS ३.१ ) इंटर्नल स्टोरेज देखील आहे. कॅमेरा: फोनच्या मागील बाजूस ४८ मेगापिक्सेल (Sony IMX 789), ५० MP अल्ट्रा-वाइड सेकंडरी कॅमेरा आणि ८ MP टेलिफोटो कॅमेरा सेन्सर आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी ३२ MP फ्रंट कॅमेरा सेन्सर आहे. बॅटरी: ८० W SuperWook फास्ट चार्जिंग व्यतिरिक्त, ५० W AirWook वायरलेस चार्जिंग सपोर्ट असलेली ५००० mAh बॅटरी फोनला पॉवरफुल बनविणायचे काम करते. फोन ८० W वायर्ड चार्जिंगच्या मदतीने हँडसेट ३२ मिनिटांत पूर्ण चार्ज होतो. वाचा: वाचा: वाचा


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3A5XvTl