मुंबई- बॉलिवूडचे शहेनशहा यांची नात सोशल मीडियावर सक्रिय असते. नव्या तिच्या आयुष्यातील प्रत्येक गोष्ट चाहत्यांशी शेअर करताना दिसते. नुकताच तिने स्वतःचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोपेक्षाही त्याखाली आलेले कमेन्ट जास्त व्हायरल होत आहेत. तसंच या पोस्टमुळे नव्या नवेली आणि रिलेशनशिपमध्ये असल्याच्या चर्चा रंगत आहेत. नव्या ने बुधवारी इन्स्टाग्राम अकाउंटवर तिचा एक ब्लॅक अँड व्हाइट फोटो शेअर केला. पहिल्या फोटोत ती कॅमेराकडे बघून हसत आहे, तर दुसऱ्या फोटोत ती खिडकीतून बाहेर बघत आहे. तिचे हे फोटो पाहून चाहते तिच्यावर फिदा झाले आहेत. फोटोंवर कमेंट आणि लाइकचा वर्षाव होतं आहे. एका युझरच्या कमेंटवर सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. त्याने लिहिले की, 'मला वाटतं की नव्या आणि सिद्धांत चतुर्वेदी एकमेकांना डेट करत आहेत. कारण दोघांनी एकाच दिवशी फोटो आणि व्हिडिओ शेअर केले आहे.' विशेष म्हणजे नव्याच्या या फोटोंवर दीपिका पादुकोणनेही 'ब्यूटी' अशी कमेन्ट केली. मग काय सिद्धांत नव्याचं एकाच दिवशी पोस्ट करण आणि दीपिकाची नव्याच्या पोस्टवर कमेंट करणं या दोन गोष्टींमुळे चाहत्यांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली. त्यामुळेच दोघं नात्यात असल्याच्या चर्चा आहेत. अमिताभ बच्चन यांची नात नव्या ही संस्थापक म्हणून काम करते आहे. 'नवेली' या एनजीओमध्ये ती काम करत आहे. हे NGO गरजू महिलांना संधी उपलब्ध करून देतं. नव्या बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार का हे अजून कळलं नाही तरी तिच्या खासगी आयुष्यामुळे नेहमीच चर्चा सुरू असते.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3IwWEhQ