Full Width(True/False)

Reliance Jio: कमी किमतीत जास्त डेटा, Jio चे हे प्लान्स आहेत युजर्सचे फेव्हरेट, मिळतात फ्री कॉलिंगसह 'हे' फायदे

नवी दिल्ली : देशातील सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी आपल्या युजर्ससाठी वेगवेगळ्या डेटा मर्यादांसह अनेक प्लान ऑफर करत आहे. तुम्हीही Reliance Jio युजर्स असाल आणि अधिक डेटासह प्रीपेड प्लान शोधत असाल, तर ही विशेष माहिती तुमच्यासाठी. आज येथे आम्ही तुम्हाला रिलायन्स जिओच्या अशा दोन प्रीपेड प्लानबद्दल सांगणार आहोत, जे तुम्हाला सर्वाधिक डेटा देतात. एवढेच नाही तर तुम्हाला यापैकी एका प्लान मध्ये OTT सबस्क्रिप्शन देखील मिळेल. वाचा: Reliance Jio चा ४१९ रुपयांचा प्रीपेड प्लान: जिओचा पहिला प्रीपेड प्लान ४१९ रुपयांचा आहे. या प्लानमध्ये ग्राहकांना दररोज ३ जीबी डेटा मिळतो आणि त्याची वैधता २८ दिवस आहे. अशा प्रकारे एकूण डेटा ८४ GB होतो. प्लानमध्ये अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग आणि दररोज १०० एसएमएस देखील दिले जातात. याशिवाय, जिओ टीव्ही, जिओ सिनेमा आणि जिओ सिक्युरिटी यांसारख्या जिओ अॅप्सचे फ्री सब्सक्रिप्शन उपलब्ध आहे. Reliance Jio चा ६०१ रुपयांचा प्रीपेड प्लान: यादीतील दुसरा प्लान ६०१ रुपयांचा आहे. ४१९ रुपयांच्या प्लानप्रमाणे यामध्ये २८ दिवसांसाठी दररोज ३ GB डेटा मिळतो. यासोबत अतिरिक्त ६ जीबी डेटा दिला जात आहे. म्हणजेच एकूण डेटा ९० GB होतो. प्लानमध्ये अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग आणि दररोज १०० मेसेजेस देखील दिले जातात. याशिवाय, जिओ टीव्ही, जिओ सिनेमा आणि जिओ सिक्युरिटी यांसारख्या जिओ अॅप्सचे फ्री सब्सक्रिप्शन उपलब्ध आहे. विशेष गोष्ट म्हणजे, यामध्ये तुम्हाला १ वर्षासाठी Disney + Hotstar चे मोफत सबस्क्रिप्शन देखील देण्यात येते. हा प्लान देखील आहे विशेष: याशिवाय कंपनीचा ४९९ रुपयांचा प्लान देखील चांगला आहे. हा प्लान २८ दिवसांच्या वैधतेसह येतो. यामध्ये दररोज २ जीबी डेटा, सर्व नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंग आणि दररोज १०० मेसेजेस दिले जातात. प्लान JioTV, JioCinema, JioNews सारख्या Jio अॅप्सच्या सबस्क्रिप्शनसह Disney + Hotstar ची मोफत सदस्यता देखील देते. वाचा: वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3KGf4P4