Full Width(True/False)

Laptop Tips: अनेक वर्ष व्यवस्थित काम करेल तुमचा लॅपटॉप, करावे लागेल 'हे' काम, पाहा टिप्स

नवी दिल्ली : करोनामुळे आजच्या काळात लॅपटॉप हा जवळ-जवळ प्रत्येकाच्या दैनंदिन जीवनाचा एक महत्त्वाचा भाग बनला आहे. विद्यार्थी, नोकरी करणारा, व्यावसायिक, करोनामुळे सर्व घरी राहूनच त्यांची कामं करत आहेत. म्हणूनच, आज काल जवळ-जवळ प्रत्येकाकडे एक चांगला आणि काम करण्यायोग्य असा लॅपटॉप असतोच. ऑनलाइन क्लासेस आणि ऑफिसच्या कामांसह अनेक महत्वाची कामं आता लॅपटॉपवरून करण्यात येत आहे. वाचा: आता स्मार्टफोनप्रमाणेच प्रत्येकाकडे लॅपटॉप असून जर तुम्हीही लॅपटॉप वापरत असाल तर त्याची काळजी घेणंही खूप गरजेचं आहे. कामानिमित्त तुम्ही तो स्वतः विकत घेतला असेल किंवा ऑफिसमधून घेतला असेल. आज आम्ही तुम्हाला काही अशा पद्धतींबद्दल सांगत आहोत, ज्याद्वारे तुम्ही तुमच्या लॅपटॉपची काळजी घेऊ शकता. अशी घ्या लॅपटॉपची काळजी काम केल्यानंतर बंद करा: लॅपटॉपला स्लीप मोडमध्ये ठेवणे सोयीचे असते, परंतु दीर्घकाळ स्लीप मोडमध्ये ठेवणे चांगले नाही. अशा स्थितीत काम संपले की लॅपटॉप बंद करा. बॅटरीला विश्रांती द्या: तज्ज्ञांच्या मते, बॅटरी चार्ज ८० टक्क्यांच्या वर आणि ४० टक्क्यांच्या खाली जाऊ देऊ नका. असे केल्याने तुमच्या बॅटरीचे आयुष्य चारपट जास्त असू शकते. लॅपटॉपल थंड ठेवा: लॅपटॉप थंड ठेवणे बॅटरीसाठी महत्त्वाचे आहे. यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्याचा कूलिंग एअरफ्लो योग्य स्थितीत काम करत राहणे आवश्यक आहे. जेव्हा हवामान गरम असते तेव्हा त्याकडे लक्ष देणे अधिक महत्वाचे आहे. वेळोवेळी अपडेट करत रहा: लॅपटॉपचे सॉफ्टवेअर अपडेट ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. सॉफ्टवेअर अपडेट्स तुमच्या लॅपटॉपला काही सुरक्षा जोखमींपासून संरक्षित करण्यात मदत करतात, तसेच बग आणि इतर किरकोळ समस्यांचे निराकरण करण्यात देखील मदत करतात. वाचा: वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3KBMz4K