नवी दिल्ली : रिलायन्स जिओने काही महिन्यांपूर्वी सर्वात स्वस्त ४जी लाँच केला होता. आता कंपनी यावर्षी आपला स्वस्त ५जी फोन लाँच करण्याची शक्यता आहे. या फोनचे स्पेसिफिकेशन्स समोर आले आहे. भारतात लवकरच ५जी सर्व्हिस सुरू होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता ५जी फोन आणण्याची तयारी करत आहे. या फोनला खूपच कमी किंमतीत भारतात लाँच होण्याची शक्यता आहे. वाचा: रिपोर्टनुसार, जिओच्या ५जी फोनवर काम सुरू आहे. फोनला याच वर्षी भारतात लाँच केले जाऊ शकते. अँड्राइड सेंट्रलने ५जी च्या काही स्पेसिफिकेशन्सचा खुलासा केला आहे. कमी किंमतीत कमी फीचर्स असलेलाच फोन येतो हे आपल्याला माहितीच आहे. सोबत ५जी सपोर्ट मिळेल, मात्र हाय एंड फीचर मिळण्याची शक्यता कमी आहे. हा अपकमिंग फोन स्नॅपड्रॅगन ४८० प्रोसेसरसह येऊ शकतो. जिओफोन ५जी सह N३, N५, N२८, N४० आणि N७८ ५जी बँडचा सपोर्ट मिळेल. मिळेल शानदार कॅमेरा आणि बॅटरी जिओच्या पहिल्या ५जी फोनमध्ये ड्यूल रियर कॅमेरा सेटअप दिला जाईल. यात १३ मेगापिक्सल मुख्य कॅमेरा आणि दुसरा २ मेगापिक्सल लेंस असेल. तर फ्रंटला ८ मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा दिला जाईल. यासोबतच, १८ वॉट फास्ट चार्जिंग सपोर्टसह ५००० एमएएचची बॅटरी मिळेल. फोनमध्ये साइड माउंटेड फिंगरप्रिंट सेंसर दिला जाईल. ३२ जीबी स्टोरेजसह येईल फोन जिओच्या या फोनमध्ये ४ जीबी रॅम आणि३२ जीबी स्टोरेज दिले जाऊ शकते. रिपोर्टनुसार, जिओफोन ५जी मध्ये ६.५ इंच LCD HD+ डिस्प्ले मिळेल. फोनसोबत जिओचे सर्व अॅप्स प्री-इंस्टॉल मिळतील. फोन अँड्राइड ११ वर काम करेल. वाचा: वाचा: वाचा:
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3H70w8Q