Full Width(True/False)

Samsung: ७,०४०mAh बॅटरीसह Samsung चा शानदार टॅब भारतात लाँच, पाहा किंमत-फीचर्स

नवी दिल्ली : India ने भारतात आपला नवीन Samsung Galaxy Tab A8 ला लाँच केले आहे. या टॅबलेटची किंमत २० हजार रुपयांपेक्षा कमी आहे. टॅबमध्ये १०.५ इंच स्क्रीन आणि यूनिसॉस टी६१८ प्रोसेसर मिळतो. याशिवाय यात ७,०४० एमएएचची बॅटरी मिळते. वाचा: Samsung Galaxy Tab A8 चे स्पेसिफिकेशन्स अँड्राइड ११ ऑपरेटिंग सिस्टमवर काम करतो. यामध्ये १०.५ इंच स्क्रीन दिली असून, याचे रिझॉल्यूशन १९२०x१२०० पिक्सल आहे. यात ऑक्टा-कोर यूनिसॉक टी६१८ प्रोसेसरसह ३ जीबी रॅम आणि १२८ जीबी इंटर्नल स्टोरेज मिळते. स्टोरेजला मायक्रोएसडी कार्डने १ टीबीपर्यंत वाढवू शकता. सॅमसंगच्या या बॅटमध्ये कनेक्टिव्हिटीसाठी ब्लूटूथ ५.०, वाय-फाय, जीपीएस, ग्लोनेस, ३.५ एमएम हेडफोन जॅक आणि यूएसबी टाइप-सी पोर्ट सारखे फीचर्स मिळतात. यात १५ वॉट फास्ट चार्जिंग सपोर्टसह ७४०० एमएएचची बॅटरी मिळते. कॅमेरा आणि अन्य फीचर्स Samsung Galaxy Tab A8 मध्ये रियरला ८ मेगापिक्सल आणि फ्रंटला ५ मेगापिक्सलचा कॅमेरा दिला आहे. तसेच, सिक्योरिटीसाठी फेस अनलॉक आणि स्टीरियो स्पीकर्स मिळतात. Samsung Galaxy Tab A8 ची किंमत Samsung Galaxy Tab A8 ची किंमत १७,९९९ रुपये आहे. टॅबच्या खरेदीवर ग्राहकांना २ हजार रुपयांपर्यंत कॅशबॅक मिळेल. नवीन टॅबला अ‍ॅमेझॉन इंडिया, फ्लिपकार्ट, ई-स्टोर आणि ऑफलाइन रिटेलवरून खरेदी करू शकता. डिव्हाइस ग्रे, सिल्वर, पिंक आणि गोल्ड रंगात उपलब्ध आहे. वाचा: वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3zSAovz