Full Width(True/False)

अश्लिल दृश्यांमुळे 'नाय वरनभात..' अडचणीत, केंद्राकडे तक्रार

मुंबई : दिग्दर्शित "वरण भात लोन्चा कोन नाय कोन्चा" या सिनेमा खूपच चर्चेत आला आहे. मात्र, हा सिनेमा प्रदर्शित होण्याआधीच वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. या सिनेमाचा ट्रेलर नुकताच रिलीज झाला आहे. त्यावरून नव्या वादाला सुरुवात झाली. सिनेमाच्या ट्रेलरमध्ये काही गोष्टी अत्यंत हिंसक आणि आक्षेपार्ह आहेत. यातील अशा काही दृश्यांवर राष्ट्रीय महिला आयोगाच्या प्रमुख रेखा शर्मा यांनी आक्षेप घेतला आहे. इतकेच नाही तर याविरोधात त्यांनी केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाला याबाबत पत्र पाठवले आहे. 'अंतिम' सिनेमानंतर महेश मांजरेकर यांनी '' हा मराठी सिनेमा घेऊन येत असल्याचं जाहीर केलं होतं. हा सिनेमा शुक्रवारी १४ जानेवारीला सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. त्याआधी सिनेमाचा ट्रेलर शेअर करत मांजरेकरांनी लिहिले होते, 'मुंबईच्या जंगलातला हा धूर कुणाला सुखासुखी जगून नाय द्यायचा. .सगळ्यांची वाट लागणार..! काँक्रीटच्या जंगलातलं वास्तव..पाहा 'नाय वरनभात लोन्चा कोन नाय कोन्चा' सिनेमाचा ट्रेलर..!' ट्रेलरमध्ये अनेक लैंगिक दृश्ये, हिंसक दृश्ये आहेत. तसेच या सिनेमाच्या ट्रेलरमध्ये अल्पवयीन मुलगा आणि महिलेची आक्षेपार्ह स्थितीतली दृश्यही दाखविली आहेत. यावर राष्ट्रीय महिला आयोगाने आक्षेप घेतला आहे. इतकेच नाही तर याविरोधात केंद्रीय माहिती प्रसारण खात्याकडे तक्रार केली आहे. हा ट्रेलर फेसबुक, यूट्यूब, ट्विटर सारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित करण्यात आला आहे. सिनेमाचा ट्रेलर पाहिल्यानंतर रेखा शर्मा यांनी केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाला पत्रव पाठवत ही सर्व दृश्ये सेन्सॉर करण्याची विनंती केली आहे.या सिनेमाचा ट्रेलर सर्वच सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर प्रसारित करण्यात आला आहे. या ट्रेलरमधून अल्पवयीन मुलांचा समावेश असलेल्या अशा लैंगिक सामग्रीच्या खुल्या प्रसारणाचा निषेध या पत्राद्वारे करण्यात आला आहे. दरम्यान, हा सिनेमा दिवंगत ज्येष्ठ नाटककार आणि पत्रकार जयंत पवार यांनी लिहिलेल्या ‘वरन भात लोन्चा नि कोन नाय कोन्चा’ या कथेवर आधारित आहे. महेश मांजरेकर यांनी या सिनेमाची पटकथा आणि दिग्दर्शन अशी दुहेरी जबाबदारी सांभाळली आहे.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/33fxBAH