मुंबई : '' या कार्यक्रमाने भारतीय टेलिव्हिजन विश्वामध्ये एकच खळबळ उडवून दिली आहे. अमेरिकन रिअॅलिटी कार्यक्रमावर आधारीत असलेला हा कार्यक्रमा भारतामध्ये '' या नावाने प्रसारित होत आहे. या कार्यक्रमात देशातील मोठे सात उद्योगपती परीक्षक म्हणून सहभागी झाले आहेत. परीक्षक म्हणून सहभागी झालेले या सर्वांनी त्यांच्या त्यांच्या उद्योगामध्ये सर्वोच्च स्थान मिळवले आहे. अर्थात त्यासाठी त्यांनी घेतलेली मेहनत, घेतलेले कष्ट हे सर्वांसाठी आदर्शवत ठरावेत असेच आहेत. कार्यक्रमात सहभागी झालेल्या उद्योगपतींमध्ये एमक्योर फार्मास्युटिकल्स च्या नमीता थापर, शुगर कॉस्टमेटिक्सच्या सीईओ आणि सहसंस्थापिका विनीता सिंह, भारत पे चे सहसंस्थापक अशनीर ग्रोवर, बोट चे सहसंस्थापक अमन गुप्ता, लेन्सकार्टचे सह संस्थापक पियुष बन्सल, पीपल ग्रुपचे संस्थापक आणि सीईओ अनुपम मित्तल, ममाअर्थ च्या सहसंस्थापिका गजल अलघ यांचा समावेश आहे. या सर्वांचे शिक्षण आणि त्यांची एकूण संपत्ती किती आहे, त्याबद्दल जाणून घेऊयात.... अमन गुप्ता ः अमन गुप्ता हे 'बोट' चे सहसंस्थापक आणि मार्केटिंग विभागाचे मुख्य आहेत. ही कंपनी अमन गुप्ता आणि समीर मेहता यांनी २०१६ मध्ये स्थापन केली. त्यांनी दिल्ली विद्यापीठातून बीबीए केलं आहे. त्यानंतर सीएची एन्ट्रन्स पास केल्यानंतर त्यांनी आयसीएआयमध्ये प्रवेश घेतला. परंतु त्यांना स्वचःचा व्यवसाय करायचा असल्याने त्यांनी इंडियन स्कूल ऑफ बिझनेस मधून फायनान्स आणि स्ट्रॅटजीमध्ये एमबीए केले. पियुष बन्सल - अवघ्या ३६ वर्षांचे पियुष बसन्ल लेंसकार्ट सारख्या प्रख्यात कंपनीच्या सीईओपदावर कार्यरत आहेत. पियुष यांनी २०१० मध्ये अमित चौधरी, सुमीर यांच्यासोबत लेन्सकार्ट ही कंपनी सुरू केली. ही कंपनी स्थापन करण्यापूर्वी पियुष बन्सल यांनी अमेरिकेतील मायक्रोसॉफ्ट कंपनीत काम केले होते. त्यानंतर २००७ मध्ये ही नोकरी सोडून ते भारतात परतले. पियुष बन्सल यांनी डॉन बॉस्कोमधून शालेय शिक्षण पूर्ण केलं त्यानंतर त्यांनी पुढील शिक्षण कॅनडामध्ये घेतले. अनुपम मित्तल- पीपल ग्रुपचे संस्थापक आणि सीईओपदाची जबाबदारी अनुपम मित्तल यांच्याकडे आहे. अनुपम यांनी शादी डॉट कॉमची स्थापना केली आहे. त्या माध्यमातून अनेकांना त्यांच्या आयुष्याचा साथीदार मिळाला आहे. अनुपम यांनी ओला कंपनीमध्ये सुमारे १ कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. इतकेच नाही तर त्या कंपनीत त्यांची भागीदारी देखील आहे. याशिवाय इलेक्ट्रिकपे, कॅशबुक आणि लिस्टेमध्ये देखील गुंतवणूक केली आहे. नमिता थापर- नमिता थापर या एमक्योर फार्मास्युटिकल्सच्या सीईओ आहेत. त्यांना द इकोनॉमिक टाइम्स अंडर फोर्टी पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे. नमिता यांनी इन्स्टिट्यूट ऑफ चार्डट अकाउन्टट ऑफ इंडियामधून सीएची पदवी घेतली आहे. त्याशिवाय त्यांनी ड्युक विद्यापीठातून बिझनेसमध्ये एमबीए केले आहे. गजल अलघ- गजल अलघ ममाअर्थच्या सहसंस्थापक आणि मुख्य इनोवेशन ऑफिसर आहेत. गजल यांनी २०१६ मध्ये या कंपनीची स्थापना केली. भारतामधील त्यांचा पहिला टॉक्सिन- फ्री बेबी केअर ब्रँड आहे. गजल यांनी इन्फोर्मेशन टेक्नोलॉजीची पदवी घेतली आहे. तसेच न्यूयॉर्कमधून मॉर्डन आर्ट, डिझाईन आणि अप्लाइड आर्टमध्ये विविध प्रकारचे शिक्षण घेतले आहे. विनिता सिंह- विनिता सिंह शुगर कॉस्मॅटिक्सच्या सीईओ आणि सहसंस्थापिका आहेत. जुलै २०१५ मध्ये त्यांनी कौशिक मुखर्जी यांच्यासोबत या कंपनीची स्थापना केली. याआधी विनिता यांनी ऑनलाईन ब्युटी सब्स्क्रिप्शन प्लॅटफॉर्म, फॅब बॅगची देखील स्थापना केली. विनिता यांनी दिल्ली पब्लिक स्कूलमधून शालेय शिक्षण घेतलं. त्यानंतर त्यांनी मद्रास आयआयटीमधून इलेक्ट्रिकल इंजिनिअरींगची पदवी घेतली. त्यानंतर आयआयएम अहमदाबाद येथून मॅनेजमेंटमध्ये मास्टर केले. रिपोर्टनुसार विनिता यांना पहिल्यापासूनच व्यवसाय करायचा होता. त्यामुळे त्यांनी प्लेसमेंटमधून आलेली १ कोटी रुपयांच्या नोकरीची ऑफर नाकारली होती. दरम्यान, शार्क टँक इंडिया हा कार्यक्रम अमेरिकन कार्यक्रमावर आधारीत आहे. अमेरिकेत या कार्यक्रमाचे १३ सिझन झाले आहेत. शार्क टँक इंडिया हा कार्यक्रम सुरू झाला तेव्हा हा कार्यक्रम स्क्रिप्टेड आहे, अशी चर्चा होत होती. मात्र परीक्षक अनुपम मित्तल यांनी हे सपशेल नाकारले होते.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3o5HlF4