नवी दिल्ली : तुम्ही जर नवीन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर वर सॅमसंगचा स्मार्टफोन स्वस्तात उपलब्ध आहे. फोनला तुम्ही फक्त ३९९ रुपयात खरेदी करू शकता. या फोनची मूळ किंमत १५,९९९ रुपये आहे. तुम्ही फोनला अधिकृत वेबसाइटवरून खरेदी केल्यास १ हजार रुपये सूट मिळेल. वाचा: Galaxy A12 ची मूळ किंमत १५,९९९ रुपये आहे. परंतु, Amazon वर १३ टक्के डिस्काउंटनंतर १३,९९९ रुपयात खरेदी करू शकता. याशिवाय बँक ऑफरचा देखील लाभ मिळेल. अॅक्सिस माइल्स अँड मोरच्या क्रेडिट कार्डचा वापर केल्यास १ हजार रुपयांपर्यंत इंस्टंट डिस्काउंट मिळेल. यामुळे फोनची किंमत कमी होऊन १२,९९९ रुपयांवर येईल. एक्सचेंज ऑफर सॅमसंगच्या या स्मार्टफोनवर १२,६०० रुपयांपर्यंत एक्सचेंज ऑफरचा लाभ मिळते. ही ऑफर जुन्या फोनच्या मॉडेल आणि कंडिशनवर अवलंबून आहे. ऑफरचा पूर्ण लाभ मिळाल्यास १२,९९९ रुपयांवरून किंमत थेट ३९९ रुपयांवर येईल. अशाप्रकारे फोनवर एकूण १५,६०० रुपयांची सूट मिळेल. Samsung Galaxy A12 चे फीचर्स सॅमसंगचा हा ४जी स्मार्टफोन ४ जीबी रॅम आणि ६४ जीबी इंटर्नल स्टोरेजसह येतो. स्टोरेजला मायक्रोएसडी कार्डने १ टीबीपर्यंत वाढवू शकता. अँड्राइड ११ वर काम करणाऱ्या या फोनमध्ये ६.५ इंच एचडी+ टीएफटी डिस्प्ले दिला असून, याचे रिझॉल्यूशन ७२०x१६०० पिक्सल आहे. यात क्वाड रीयर कॅमेरा सेटअप दिला असून, याचा मुख्य कॅमेरा ४८ मेगापिक्सल, ५ मेगापिक्सल अल्ट्रा वाइड कॅमेरा, २ मेगापिक्सल रिफाइन्ड मॅक्रो कॅमेरा आणि २ मेगापिक्सल डेप्थ कॅमेरा आहे. पॉवरसाठी ५००० एमएएचची बॅटरी मिळते. वाचा: वाचा: वाचा:
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3sPTUHE