मुंबई:अनेक वर्षांपासून मनोरंजन विश्वामध्ये '' ही मालिका लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. गोकुळधाममधला जेठालाल, गरबाक्वीन दयाबेन, लेखक तारक मेहता ,कडक शिस्तीचे भिडे मास्तर, 'दुनिया हिला दूंगा' म्हणणारा पत्रकार पोपटलाल, खोडकर टप्पू, अय्यर, डॉ. हाथी, सोढी ही सगळी पात्रं आज प्रेक्षकांच्या कुटुंबाचा एक भाग बनली आहेत. यातील अनेक कलाकार मालिकेत दिसतात तसे खऱ्या आयुष्यात दिसत नाहीत. या कलाकारांचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. मालिकेतील एका कलाकाचा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालाय. या फोटोत त्याला ओळखताही येत नसल्याचं नेटकऱ्यांनी म्हटलं आहे. या मालिकेतील जेठालालचा बेस्ट फ्रेंड आणि लेखक तारक मेहता ही भूमिका साकारत आहेत. ही भूमिका देखील लोकप्रिय झाली आहे. शैलेश लोढा यांचा एक फोटो व्हायरल झाला असून हा जुना फोटो त्याच्या तरुणपणातील आहे. शैलेश लोढा यांनी स्वत: त्यांच्या अकाऊंटवर हा फोटो शेअर केला आहे. या फोटोत मी स्वत:लाच ओळखू शकत नाहीए, असं कॅप्शनही त्यांनी या फोटोला दिलं आहे. शैलेश यांच्या खूपच बदल झाल्याचं त्यांचे चाहते म्हणत आहेत.मालिका सुरू होण्यापूर्वीचा हा फोटो आहे. शैलेश लोढा यांचं मानधन किती? 'तारक मेहता का उल्टा चश्मा' मालिकेतील कलाकारांची लोकप्रियता प्रचंड आहे. सर्वच कलाकारांचा चाहता वर्ग मोठा आहे. त्यामुळं हे कलाकार मानधनही मोठं घेतात. या कलाकारांची मानधनाची रक्कम ऐकून तुम्ही आश्चर्यचकित व्हाल. शैलेश यांच्याबद्दल बोलायचं झालं तर ते एका एपिसोडसाठी एक लाखांपर्यंत मानधन घेत असल्याचं म्हटलं जात आहे.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3ETmAC3