Full Width(True/False)

शाओमीच्या या 5G फोनवर १० हजार ५०० रुपयांपर्यंत सूट, २८ फेब्रुवारी पर्यंत ऑफर

नवी दिल्ली: तुम्हाला जर तुमच्यासाठी किंवा तुमच्या कुटुंबातील एखाद्या व्यक्तीसाठी चांगला 5G स्मार्टफोन खरेदी करायचा असेल तर तुम्ही Xiaomi च्या Xiaomi 11 Lite NE 5G चा विचार करू शकता. विशेष म्हणजे फोन खरेदी करतांना तुम्हाला जबरदस्त डिस्काऊंटचा लाभ घेऊन मोठी बचत देखील करता येईल. Xiaomi 11 Lite NE 5G च्या खरेदीवॉर तुम्ही बँक ऑफर्स आणि कार्ड ऑफर्स देखील मिळवू शकता.ही ऑफर तुम्ही ई कॉमर्स साईटवर मिळवू शकता. Amazon India वर फॅब फोन फेस्ट सेल सुरु झाला असून २८ फेब्रुवारीपर्यंत चालणाऱ्या या सेलमध्ये तुम्ही Xiaomi चा मस्त स्मार्टफोन Xiaomi 11 Lite NE 5G फक्त १०,५०० रुपयांच्या ऑफसह घरी आणू शकता. फोनवर उपलब्ध असलेल्या या आश्चर्यकारक सवलतीमध्ये ५ हजार रुपयांपर्यंतचा एक्सचेंज बोनस,१,००० रुपयांची कूपन सूट आणि HDFC बँक कार्ड पेमेंटवर ४५०० रुपयांची इन्स्टंट सूट समाविष्ट आहे. वाचा: Xiaomi 11 Lite NE 5G ची वैशिष्ट्ये: फोनमध्ये, कंपनी २४०० x१०८० पिक्सेल रिझोल्यूशनसह ६.५५ -इंच १० बिट AMOLED डिस्प्ले देत आहे. HDR10+ सपोर्टसह येणाऱ्या या डिस्प्लेमध्ये कंपनी ९० Hz चा रिफ्रेश दर आहे. Xiaomi 11 Lite NE 5G ८ GB पर्यंत LPDDR4x RAM आणि १२८ GB UFS 2.2 स्टोरेजने सुसज्ज आहे. प्रोसेसर म्हणून तुम्हाला या फोनमध्ये Snapdragon 778G 5G चिपसेट पाहायला मिळेल. फोटोग्राफीची आवड असणाऱ्यांसाठी देखील Xiaomi 11 Lite NE 5G एक चांगला पर्याय आहे. फोटोग्राफीसाठी या फोनमध्ये एलईडी फ्लॅशसह ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप आहे. यात ८ -मेगापिक्सलचा अल्ट्रा-वाइड अँगल कॅमेरा ६४ -मेगापिक्सेलचा प्राथमिक कॅमेरा देण्यात आला आहे. Xiaomi 11 Lite NE 5G मध्ये ५ -मेगापिक्सेलचा टेलीमॅक्रो कॅमेरा आहे. सेल्फीसाठी तुम्हाला फोनमध्ये २० मेगापिक्सेल कॅमेरा मिळेल. Xiaomi 11 Lite NE 5G ला पॉवर देण्यासाठी यामध्ये ४२५० mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. ही बॅटरी ३३ W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.साइड-माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सरने सुसज्ज हा फोन MIUI 12.5 ऑपरेटिंग सिस्टमवर काम करतो. कनेक्टिव्हिटीसाठी, 5G (12 बँड सपोर्ट), 4G LTE, वाय-फाय ६ ब्लूटूथ v5.2, GPS / A-GPS, NFC, IR ब्लास्टर आणि USB टाइप-सी पोर्ट सारखी वैशिष्ट्ये देण्यात आली असून Xiaomi 11 Lite NE 5G फोन साइड-माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सरसह सुसज्ज आहे. वाचा: वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/dBnYhEF