Full Width(True/False)

Airtel: एअरटेलचा सर्वात स्वस्त रिचार्ज प्लान, ५८ रुपयांपासून सुरु; मिळेल ३ जीबी डेटासह कॉलिंगचा फायदा

नवी दिल्ली: टेलिकॉम कंपनी कडे यूजर्ससाठी वेगवेगळ्या प्राइस रेंजमध्ये येणारे अनेक प्लान्स उपलब्ध आहे. एअरटेलकडे ५८ रुपयांचा सर्वात स्वस्त रिचार्ज उपलब्ध आहे. एअरटेलचा हा सर्वात स्वस्त प्लान स्वरुपात येतो. यात ३ जीबी डेटा दिला जात आहे. एअरटेलच्या या सर्वात स्वस्त प्लानबद्दल जाणून घेऊया. वाचा: Airtel चा ९९ रुपयांचा प्लान गेल्यावर्षी प्रीपेड टॅरिफमध्ये वाढ झाल्यानंतर ७९ रुपयांची प्लानची किंमत ९९ रुपये करण्यात आली होती. या प्लानमध्ये यूजर्सला २०० एमबी डेटा, ९९ रुपये टॉकटाइम, १ पैसा टॅरिफ कॉल, लोकल एसएमएससाठी १ रुपये आणि एसटीडी एसएमएससाठी १.५ रुपये चार्ज लागेल. ९९ रुपयांच्या प्लानची वैधता २८ दिवस आहे. डेटा, कॉलिंग आणि एसएमएस बेनिफिट्ससह येणारा हा सर्वात स्वस्त प्लानपैकी एक आहे. एअरटेलचे स्वस्त डेटा वाउचर एअरटेलकडे १०० रुपयांपेक्षा कमी किंमतीत येणारे स्वस्त डेटा वाउचर उपलब्ध आहे. मात्र, तुमच्याकडे अ‍ॅक्टिव्ह असल्यावरच हे डेटा वाउचर कामी येतील. एअरटेलच्या डेटा वाउचरची सुरुवाती किंमत ५८ रुपये आहे. यामध्ये यूजर्सला ३ जीबी डेटा मिळतो. कंपनीकडे ९८ रुपयांचा देखील डेटा वाउचर असून, यामध्ये Wynk Music Premium सह ५ जीबी डेटा मिळतो. दोन्ही वाउचरची वैधता तुमच्या सध्याच्या प्रीपेड प्लान एवढी असेल. एअरटेलने बंद केला होता ४९ रुपयांचा २०२१ मध्ये एअरटेलने ४९ रुपयांचा प्लान बंद केला होता. तसेच, ७९ रुपयांच्या प्लानची किंमत वाढवून ९९ रुपये केली आहे. वाचा: वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/Vy3zNglLC