Full Width(True/False)

OO Antava साठी निर्मात्यांनी थांबवलेली गणेश आचार्यची सर्जरी

मुंबई- '' चित्रपटातील सर्वचं गाणी लोकप्रिय झाली आहेत. मात्र आणि सामंथा रूथ प्रभूचं Ooantava हे गाणं सध्या चांगलं चर्चेत आहे. यात सामंथा आणि अल्लूचा डान्सवर प्रेक्षक फिदा आहेत. या गाण्यावर अनेक रिल्स तयार होत आहेत. उ अंटवा या गाण्याची कोरिओग्राफी प्रसिद्ध नृत्यदिग्दर्शक यांनी केली आहे. गाण्याच्या चित्रीकरणा दरम्यानचे अनेक किस्से आहेत. असाच एक किस्सा गणेश आचार्य यांनी सांगितला आहे. गणेश यांनी ई-टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं की त्यांना उ अंटवा गाण्याची कोरियोग्राफी करण्यासाठी फक्त १५ दिवस दिले होते. इतकंच नाही तर त्यांना मोतीबिंदूचं ऑपरेशनही पुढे ढकलायला सांगितलं होते, जेणेकरून ते या गाण्यावर काम करू शकतील. ते म्हणाले, 'हा चित्रपट १७ डिसेंबर रोजी प्रदर्शित होणार होता आणि अल्लू अर्जुनने मला २ तारखेला बोलावून सांगितलं की मास्टरजी एक गाणं करायचं आहे. मी त्यांना सांगितलं की हे शक्य नाही आणि खूप कमी वेळ आहे आणि उद्या माझं मोतीबिंदूचं ऑपरेशन आहे.' उ अंटवा गाण्यासाठी चित्रपटाच्या दिग्दर्शकांना गणेश आचार्यचं हवे होते आणि म्हणून त्यांनी थेट त्यांच्या डॉक्टरांना फोन लावला आणि ऑपरेशन पुढे ढकलण्याची विनंती केली. मग त्यांनी गणेश आचार्य यांना फोन करून या गाण्याला नृत्यदिग्दर्शन करायला सांगितलं आणि दोन दिवसांत या गाण्याच्या चित्रीकरणाला सुरूवात झाली. अल्लू अर्जुन आणि गणेश यांनी आधी एकत्र काम केलं आहे. परंतु ते पहिल्यादाच सामंथा रूथ प्रभु सोबत काम करत होते. कामुक नृत्यदिग्दर्शनाबाबत बोलताना गणेश यांनी सांगितलं की, 'कामुकता दाखवण्याचे वेगवेगळे मार्ग आहेत. एखाद्या महिलेने तिची साडी तिच्या पायावरून थोडी वर उचलली तरी ती सेक्सी दिसू शकते. मी खूप नशीबवान आहे की अल्लू आणि सामंथाने त्यांच्या उत्तम अभिनय शैलीमुळे गाण्याला सेक्सी बनवलं. त्यामुळे मला वेगळं असं काही करावं लागलं नाही.'


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/bYP5mk910