Full Width(True/False)

'या' स्वस्त प्लान्ससमोर सर्वच फेल, २०० रुपयांपेक्षा कमी किंमतीत मिळतोय ५६ जीबी डेटा आणि कॉलिंगचा आनंद

नवी दिल्ली: भारत संचार निगम लिमिटेडला (BSNL) आपल्या स्वस्त प्लान्ससाठी ओळखले जाते. बीएसएनएलकडे स्वस्त प्लान्सची एक पूर्ण रेंज आहे. एकमेव कंपनी आहे, जिने प्रीपेड टॅरिफमध्ये वाढ केलेली नाही. यामुळे , आणि वीआयच्या तुलनेत कंपनीकडे स्वस्त प्लान्स उपलब्ध आहेत. कंपनीकडे २०० रुपयांपेक्षा कमी किंमतीचे प्लान्स आहेत. या प्लान्समध्ये डेटा, कॉलिंग आणि एसएमएसची सुविधा मिळते. या प्लान्समध्ये मिळणाऱ्या फायद्यांविषयी जाणून घेऊया. वाचा: BSNL चा १८७ रुपयांचा प्लान BSNL च्या या प्लानमध्ये दररोज २ जीबी डेटा, दररोज १०० एसएमएस आणि अनलिमिटेड वॉइस कॉलिंगसह २८ दिवसांची वैधता मिळते. म्हणजेच, २०० रुपयांपेक्षा कमी किंमतीत एकूण ५६ जीबी डेटा मिळत आहे. सोबतच, BSNL Tunes चा फायदा मिळेल. BSNL चा १८५ रुपयांचा प्लान कंपनीच्या या प्लानमध्ये २८ दिवसांसाठी दररोज १ जीबी यानुसार एकूण २८ जीबी डेटा मिळतो. याशिवाय दररोज १०० एसएमएस आणि अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा मिळेल. BSNL चा १८४ रुपयांचा प्लान या प्लानमध्ये यूजर्सला दररोज १ जीबी डेटा, दररोज १०० एसएमएस आणि अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा मिळते. डेटा समाप्त झाल्यानंतर ८० केबीपीएसच्या स्पीडने नेट वापरू शकता. प्लानची वैधता २८ दिवस आहे. BSNL चा १४७ रुपयांचा प्लान या प्लानमध्ये ३० दिवसांच्या वैधतेसह एकूण १० जीबी डेटा, अनलिमिटेड कॉलिंग आणि PRBT सर्व्हिसचा फायदा मिळतो. BSNL चा १३९ रुपयांचा प्लान या प्लानमध्ये ३० दिवसांच्या वैधतेसह एकूण २ जीबी डेटा आणि अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा मिळते. प्लानमध्ये एसएमएसची सुविधा मिळत नाही. BSNL चा ११८ रुपयांचा प्लान या प्लानमध्ये २६ दिवसांसाठी दररोज ०.५ जीबी डेटा आणि अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा मिळते. यात PRBT सर्व्हिसचा फायदा मिळेल. मात्र, प्लानमध्ये एसएमएसची सुविधा मिळत नाही. वाचा: वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/HxarqmGLC