नवी दिल्ली: या वर्षी बाजारात येण्याची शक्यता आहे. एका नवीन अहवालात असे म्हटले आहे की, सप्टेंबरमध्ये समोर आलेल्या कथित पेटंट ड्रॉइंगनुसार, हा आगामी स्मार्टफोन पेरिस्कोप लेन्ससह लाँच केला जाऊ शकतो. कॅमेरा मॉड्युलबद्दल बोलायचे झाले तर ते त्याच्या आत सेकंडरी स्क्रीन देखील देईल. OnePlus 10 Ultra देखील आगामी OnePlus 10R प्रमाणे MediaTek Dimensity 9000 SoC द्वारे समर्थित असेल. गेल्या महिन्यात OnePlus 10 Ultra ला इंजिनिअरिंग व्हेरिफिकेशन टेस्टिंग (EVT) फेजमध्ये ठेवण्यात आले होते. यावरुन हा फोन लवकरच लाँच केला जाऊ शकतो असे सूचित होते. MyDrivers ने अहवाल दिल्याप्रमाणे, टिपस्टर TechInsider (@TechInsiderBlog) ने OnePlus 10 Pro पेक्षा वेगळ्या डिझाइनसह स्मार्टफोनचे काही कथित पेटंट फोटो शेअर केले आहेत. वाचा: हे फोटो सप्टेंबर २०२१ मध्ये दाखल करण्यात आले होते. यावरून असा अंदाज वर्तविण्यात येत आहे की, हा OnePlus 10 Ultra असू शकतो. अहवालानुसार, त्याच्या मागील कॅमेरा मॉड्यूलमधील तिसरा सेन्सर पेरिस्कोप लेन्स असण्याची अपेक्षा आहे. रिपोर्टमध्ये असेही सांगण्यात आले आहे की, OnePlus 10 Ultra मध्ये पेरिस्कोप लेन्सच्या बरोबरीने दुय्यम डिस्प्ले दिला जाऊ शकतो. म्हणजेच वन प्लसचा नवीन स्मार्टफोन OnePlus 10 Ultra, एक नाही तर दोन डिस्पेलसह येणार आहे. ड्रॉइंगनुसार, OnePlus 10 Ultra ची उर्वरित डिझाईन OnePlus 10 Pro सारखीच आहे. त्याचा डिस्प्ले वक्र असू शकतो. यामध्ये एक अलर्ट स्लाइडर आणि पॉवर बटण देखील दिले जाऊ शकते. फोनच्या डाव्या बाजूला व्हॉल्यूम रॉकर आणि तळाशी दोन स्पीकर ग्रिल्स आणि USB टाइप-सी पोर्ट मिळू शकतात. अहवालानुसार, त्याच्या मागील कॅमेरा मॉड्यूलमधील तिसरा सेन्सर पेरिस्कोप लेन्स असण्याची अपेक्षा आहे. OnePlus 10 Ultra नवीन लाँच केलेल्या MediaTek Dimensity 9000 प्रोसेसरसह ऑफर केले जाऊ शकते. हे डिव्हाइस २०२२ च्या उत्तरार्धात लाँच केले जाऊ शकते. किंमतीबद्दल बोलायचे झाल्यास, OnePlus 10 Ultra ची किंमत OnePlus 10 Pro पेक्षा खूप जास्त असू शकते. OnePlus 10 Ultra ने नेमकी किंमत किती असेल आणि तुम्हाला तो खरेदी करण्यासाठी किती रुपये मोजावे लागतील हे OnePlus 10 Ultra झाल्या नंतरच स्पष्ट होईल. वाचा: वाचा: वाचा:
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/D0zKoWanJ