मुंबई- कंगना रनौत 'लॉकअप' शोमधून ओटीटीवर पदार्पण करणार आहे. कंगना या शोचं सूत्रसंचालन करताना दिसेल. यातील काही सर्पधकांची नावंही जाहीर झाली आहेत. सोशल मीडियावर याचा एक प्रोमो व्हायरल होत आहे. मात्र आता या शोवर सध्या कायदेशीर खटला सुरू आहे. एकता कपूरचा पहिला रिअॅलिटी शो 'लॉकअप' वर संकलपना चोरल्याचा गंभीर आरोप केला जात आहे. शो कायदेशीर अडचणीत अडकला आहे. २७ फेब्रुवारीपासून ऑल्ट बालाजी आणि एमएक्स प्लेअरवर सुरू होणाऱ्या या शोवर कायदेशीर खटला सुरू आहे. याचिकाकर्ते मिस्ट सनोबर बेग यांनी एमएक्स प्लेअर वर तुरुंगाची संकल्पना चोरल्याचा आरोप केला आहे. ही संकल्पना त्यांची असल्याचा सनोबार यांनी सांगितलं. तुरुंग संकल्पना कथा आणि स्क्रिप्टचा तो एकमेव हक्कधारक आहे. त्याच्या अर्जावर हैदराबादच्या सिटी सिव्हिल कोर्टात सुनावणी झाली. कॉपीराइटच उल्लंघनाच्या प्रकरणाबाबत कोर्टाने शो लॉकअप सीरिज रिलीज करण्यावर स्थगितीचे आदेश जारी केले आहेत. त्यामुळे या प्रकरणाची पुढील सुनावणी मार्चमध्ये होणार आहे. एकताने चोरली संकल्पना बेग म्हणाले की, 'जेव्हा मी शोचा प्रोमो पाहिला तेव्हा मला आश्चर्य वाटले. हा शो फक्त आमच्या संकल्पनेसारखाच नसून तो पूर्णपणे कॉपी केलेला आहे. हे कॉपीराइट उल्लंघन आहे. न्यायालयाने याला स्थगिती दिली आहे. तरीही शो ऑन एअर झाला तर तो न्यायालयाचा अवमान होईल. उल्लंघन सिद्ध झाल्यास, प्रॉडक्शन हाऊसला कॉपीराइट कायद्याच्या कलम ५१ आणि ५२ अंतर्गत परिणामांना सामोरे जावे लागेल. या सर्पधकांची नावं आली समोर निर्मात्यांनी लॉकअप शोच्या काही सर्पधकांची नावं जारी केली आहेत. याचा प्रोमो देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या यादित बबिता फोगट, निशा रावल, मुनव्वर फारुकी, पुनम पांडे सहभागी झाले आहेत. त्याचसोबत असंही सांगितलं जात आहे की यात राखी सावंतचा नवरा रितेश सिंगला पण शोसाठी विचारण्यात आलं आहे.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/GzPCHM9