मुंबई- शुक्रवारी आलिया भट्टचा बहूचर्चित चित्रपट 'गंगूबाई काठियावाडी' रिलीज झाला. सध्या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. आलियाच्या अभिनयाचं कौतुक केलं जात आहे. काही दिवसांपूर्वी आलियाच्या चित्रपटावर कंगनाने जोरदार टीका करत तिला मूवी माफिया म्हटलं होतं. परंतु आता कंगनाचं मत परिवर्तन झाल्याचं दिसत आहे. कंगना नेहमीच आपलं मत ठामपणे मांडताना दिसते. देशाच्या समकालीन समस्या आणि चित्रपटांवर ती अनेकदा आपलं मत व्यक्त करते. आता तिने आलियाच्या चित्रपटावर आपलं मत मांडत सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. तिने गंगूबाई काठियावाडी मधील आलियाच्या अभिनयाचं कौतुक केलं आहे. ती म्हणाली की, 'चित्रपट माफिया चांगलं काम करेल असं मला वाटलं नव्हतं.' कंगनाने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर एक पोस्ट शेअर केली, त्यात ती म्हणाली की, 'हे ऐकून आनंद झाला की दक्षिणेतील चित्रपटाने रेकॉर्डब्रेक कलेक्शनसह चित्रपटगृहांना पुनरुज्जीवन दिलं आहे. हिंदी चित्रपटही छोटी छोटी पावलं उचलत आहे. नुकताच रिलीज झालेला महिला केंद्रित चित्रपट, ज्यात एक हिरो आणि एक सुपरस्टार दिग्दर्शक आहे. ही जरी छोटी पावलं असली तरी फायदेशीर आहेत. इथे व्हेंटिलेटरवर असलेल्या चित्रपटगृहांसाठी हे सर्व टप्पे महत्त्वाचे ठरतील.' अभिनेत्री कंगनाने पुढे लिहिलं, 'वाटलं नव्हतं की मूवी माफिया काही चांगलं करेल. जर का ती असचं करत असेल तर मी तिचं कौतुक करेन.' कंगना रणौतने गंगूबाई काठियावाडी सिनेमावर केली होती टीका कंगनाने काही दिवसांपूर्वी आणि गंगूबाई चित्रपटावर टीका केली होती. अभिनेत्री म्हणाली, शुक्रवारी बॉक्स ऑफिसवर २०० कोटी रुपये जळून राख होतील. ब्रिटीश पासपोर्ट असणारे बाबा, रोम-कॉम बिम्बो काम करू शकते हे सिद्ध करायचं आहे. सर्वात मोठी कमतरता म्हणजे चित्रपटाचं कास्टिंग चुकीचं आहे. त्यात सुधारणा होणार नाही. दाक्षिणात्य आणि हॉलीवूडचे चित्रपट पडद्यावर कमाई करत आहेत यात काहीच आश्चर्य नाही. कारण जोपर्यंत चित्रपट माफियांची सत्ता आहे बॉलिवूडचं काही होऊच शकणार नाही.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/PwV270Q