Full Width(True/False)

रशिया-युक्रेनच्या युद्धात ट्विटरची एंट्री, 'या' अकाउंट्सला ब्लॉक केल्यानंतर घेतला यू-टर्न

रशिया-युक्रेनच्या भांडणात ट्विटरची एंट्री, या अकाउंट्सला ब्लॉक केल्यानंतर घेतला यू-टर्न नवी दिल्ली: रशियाने युक्रेनवर लष्करी कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. पहिल्या दिवसाच्या युद्धात जवळपास शेकडो सैनिकांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. रशिया-युक्रेनमुळे आता प्रत्येकजण ही तिसऱ्या महायुद्धाची सुरुवात तर नाही ना? असा प्रश्न विचारत आहे. या युद्धाच्या पार्श्वभूमीवर नागरिक ट्विटरवर प्रतिक्रिया देत आहे. त्यातच, ट्विटरने काही अकाउंट्सला ब्लॉक केले आहे. ट्विटरने रशिया आणि युक्रेनशी संबंधित फुटेज आणि माहिती देणाऱ्या यूजर्सच्या अकाउंटला अचानक ब्लॉक केले होते. मात्र, नंतर कंपनीने हे चुकीने झाल्याचे म्हणत पुन्हा या अकाउंट्सला अनब्लॉक केले आहे. वाचा: ओपन सोर्स इंटेलिजेंसचे (ओएसआयएनटी) संशोधक ओलिव्हर अ‍ॅलेक्जेंडर यांनी एका ट्विटर पोस्टमध्ये म्हटले की, ‘ गेल्या २४ तासात दोनदा ब्लॉक झाल्यानंतर पुन्हा परत आलो आहे. पहिल्यांदा तोडफोड/गॅस हल्ल्याची माहिती दिल्यानंतर आणि दुसऱ्यांना रशियात युक्रेनच्या हल्ल्याशी संबंधित माहिती दिल्यानंतर ब्लॉक केले. ट्विटरला अशा ब्लॉकविरोधात कारवाई करायला हवी.’ तसेच, ओएसआयएनटी चे अन्य संशोधक कायल ग्लेन यांचे अकाउंट देखील १२ तासांसाठी ब्लॉक होते. ट्विटरने म्हटले की, चुकीने रशियन सैन्याच्या हालचालींबाबत माहिती शेअर करणाऱ्या काही अकाउंट्सला ब्लॉक केले होते. ट्विटरचे साइट इंटिग्रिटीचे प्रमुख योएल रोथने ट्विट करत म्हटले आहे की, कंपनीच्या ह्यूमन मॉडरेशन टीमकडून चूक झाली आहे. ट्विटरने दिले स्पष्टीकरण ट्विटरने याबाबत स्पष्टीकरण देताना म्हटले आहे की, ‘दिशाभूल करणाऱ्या सामग्रीवर तत्परतेने प्रतिबंध घालताना नकळत इतर अकाउंट्स देखील ब्लॉक झाले. आम्ही ही समस्या सोडवण्यावर काम करत आहे व संबंधित लोकांशी संपर्क करत आहोत.’ दरम्यान, रशिया-युक्रेनच्या युद्धात मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाली आहे. युक्रेनचे अध्यक्ष व्लजिमिर झिल्येन्स्की यांनी युद्धाच्या पहिल्या दिवशी १३७ जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती दिली आहे. तसेच, रशियाने युक्रेनमधील चेर्नोबिल अणुभट्टीवर ताबा मिळवलाय. रशियाने युक्रेनवर केलेल्या हल्ल्यानंतर अमेरिकेसह अनेक देशांनी कठोर निर्बंध देखील लादले आहेत. वाचा: वाचा: वाचा


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/LMpoRCu