Full Width(True/False)

रशिया-युक्रेन युद्धाचा फटका, स्मार्टफोन आणि लॅपटॉपसह या वस्तू महागणार?, पाहा डिटेल्स

नवी दिल्ली : रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धात दोन्ही देशांना मोठ्या प्रमाणात नुकसान सहन करावे लागत आहे. आतापर्यंत अनेकांना त्यांचा जीव देखील गमवावा लागला असून बाजारपेठेवर देखील याचा परिणाम पाहायला मिळत आहे. जर युद्ध दीर्घकाळ चालले, तर त्याचा प्रभाव केवळ रशिया आणि युक्रेनपुरताच मर्यादित राहणार नाही .हे नक्की. युद्धामुळे या दोन्ही देशांत झालेल्या नुकसानामुळे स्मार्टफोन, कार आणि लॅपटॉपसह प्रत्येक इलेक्ट्रॉनिक उत्पादनाची किंमत भारतात आणि जगभरात प्रचंड वाढू शकते. अशात स्मार्टफोनसाठी आवश्यक असेल्या चिपसेटची टंचाई निर्माण होऊ शकते असा अंदाज वर्तविण्यात येत आहे. अहवालानुसार, युक्रेन अमेरिकेला ९० टक्के सेमीकंडक्टर ग्रेड निऑनचा पुरवठा करते. हेच ३५ टक्के पॅलेडियम रशियाकडून अमेरिकेला पुरवले जाते. ही दोन्ही उत्पादने चिपसेट निर्मितीमध्ये महत्त्वाची भूमिका बजावतात. वाचा: जागतिक पुरवठ्यात रशियाचा वाटा ४५ टक्के आहे. युक्रेन आणि रशियाकडून होणारा पुरवठा बंद झाल्यास, सेन्सर्स आणि मेमरीसह उत्पादनाचे काम थांबू शकते. तसेच, युक्रेन आणि रशियामधून येणाऱ्या धातूच्या पुरवठ्यामुळे चिपसेटचे उत्पादन थांबू शकते. हे सर्व घटक सेमीकंडक्टर बनवण्याच्या व्यवसायाला ब्रेक लावू शकतात. जपानी कंपनीने चिंता व्यक्त केली: एका जपानी चिप निर्मात्याने सांगितले की, या उत्पादनांचा पुरवठा आधीच कमी आहे. अशा परिस्थितीत, युद्धामुळे पुरवठा पूर्णपणे बंद केला जाऊ शकतो, ज्यामुळे गंभीर संकट निर्माण होऊ शकते. अशा परिस्थितीत चिपच्या किमतीत मोठी वाढ होऊ शकते. सेमीकंडक्टर चिप्स कशा बनवल्या जातात: सेमीकंडक्टर म्हणजे काय? सेमीकंडक्टरचा वापर विद्युत प्रवाह नियंत्रित करण्यासाठी केला जातो. सेमीकंडक्टर प्रत्यक्षात सिलिकॉनपासून बनवले जातात. ते विजेचे चांगले वाहक आहेत. जे मायक्रो सर्किटमध्ये बसवून तयार केले जाते. सोप्या भाषेत सांगायचे तर, सेमीकंडक्टर शिवाय कोणत्याही इलेक्ट्रॉनिक उपकरणाची कल्पना केली जाऊ शकत नाही. सेमीकंडक्टर कृत्रिम बुद्धिमत्ता, क्वांटम संगणन, वायरलेस नेटवर्किंग, 5G, IoT, ड्रोन, रोबोटिक्स, गेमिंग उद्योगांमध्ये वापरले जातात. रशियाच्या हल्ल्यानंतर युक्रेनच्या अनेक भागात इंटरनेटची समस्या निर्माण झाली असून अनेक भागात इंटरनेट युजर्स फिक्स्ड-लाइन सेवा वापरण्यास अक्षम आहे. तसेच, रशिया आणि युक्रेनच्या या युद्धात पहिल्याच दिवशी शेकडो जणांचा मृत्यू झाला आहे. युक्रेनचे अध्यक्ष व्लजिमिर झिल्येन्स्की यांनी ही माहिती दिली आहे. वाचा: वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/STvdtum