Full Width(True/False)

हॉलिवूडचं हे स्टार कपल ऑस्करच्या शर्यतीत, चाहत्यांना उत्सुकता

मुंबई टाइम्स टीम जेवियर बार्डेम की पिनोलोपी क्रुझ... या दोघांपैकी ऑस्करची बाहुली कोण घरी नेणार, अशा पैजा लागल्या आहेत. पण मिळण्याआधीच त्यांना आगळाच मान मिळाल्याचा तो म्हणजे ऑस्कर नामांकनात संधी मिळालेल्या पती-पत्नींच्या यादीत नोंद झालेलं ते सहावं जोडपं ठरलं आहे. त्यामुळे दोघांपैकी एक जण जरी ऑस्कर विजेता ठरला, तरी ऑस्कर एकाच घरात जाणार आहे. विशेष म्हणजे जेवियर बार्डेमला सर्वोत्कृष्ट अभिनेत्यांच्या यादीत तर पिनोलोपीला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रींच्या नामांकनात स्थान मिळालं आहे. पती-पत्नी सर्वोत्कृष्ट अभिनेता आणि अभिनेत्री म्हणून पुरस्काराच्या शर्यतीत असण्याचा यंदाचा योग आगळाच मानायला हवा. ऑस्करच्या इतिहासात लिन फाँटेन आणि अल्फ्रेड ल्यूंट हे एकाच वर्षी ऑस्करसाठी नामांकन मिळालेलं पहिलं जोडपं ठरलं होतं. १९३१-३२मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘द गार्ड्समन’ या सिनेमासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेता आणि सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीसाठी त्यांना नामांकन मिळालं होतं. मात्र दोघांनाही पुरस्कार मिळू शकला नाही. १९५३ मध्ये गायक-अभिनेता फ्रँक सिनात्रा आणि एवा गार्डनर या दोघांना ऑस्कर नामांकन मिळालं होतं. सिनात्रा यांना ‘फ्रॉम हिअर टू इटर्निटी’ सिनेमासाठी सहायक अभिनेता म्हणून नामांकन मिळालं होतं. तर एवाला ‘मोगँबो’ सिनेमासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीसाठी नामांकन मिळालं होतं. सिनात्रा यांना सहायक अभिनेत्यासाठीचं ऑस्कर मिळालं होतं. १९५७मध्ये एल्सा लाँस्टेस्टर आणि चार्ल्स लॉफ्टन यांना नामांकन मिळालं होतं. ‘द प्रायव्हेट लाइफ ऑफ हेन्री एट्थ’साठी चार्ल्स लॉफ्टन तर एल्सा यांना ‘विटनेस फॉर द प्रॉसिक्युशन’ या सिनेमासाठी नामांकन मिळालं होतं. विशेष म्हणजे एल्साला सहायक अभिनेत्री म्हणून नामांकन मिळालं होतं. ते त्यांचं दुसरं ऑस्कर नामांकन होतं. तर सर्वोत्कृष्ट अभिनेत्याच्या यादीत चार्ल्स यांना नामांकन मिळालं होतं. दोघांनाही पुरस्कारानं मात्र हुलकावणी दिली. १९६३मध्ये रेक्स हॅरिसन आणि त्यांची पत्नी रॅचेल रॉबर्टस यांना ऑस्कर नामांकनात स्थान मिळालं होतं. रॅचेलला ‘द स्पोर्टिंग लाइफ’ सिनेमासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रींच्या यादीत नामांकन मिळालं होतं. तर हॅरिसन यांना ‘क्लिओपात्रा’साठी सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून नामांकन मिळालं होतं. एके काळी अत्यंत लोकप्रिय असलेले हॉलिवूडमधील जोडपे एलिझाबेथ टेलर आणि रिचर्ड बर्टन यांना १९६६मध्ये ‘हू इज अफ्रेंड ऑफ व्हर्जिनिया वूल्फ’ सिनेमासाठी नामांकन मिळालं होतं. एलिझाबेथ टेलरसाठी हा सिनेमा ऑस्कर पुरस्कार मिळवून देणारा ठरला. एकूण आजवर जोडप्यांमध्ये ऑस्कर पुरस्कार फक्त दोघांच्या वाट्याला आला. यंदा ऑस्करमध्ये नवा इतिहास लिहिला जाणार का, हे पाहायला हवं.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/njgdu5q