मुंबई : '' ही मालिका छोट्या पडद्यावरील अत्यंत लोकप्रिय मालिका आहे. या मालिकेची नायिका आणि यशवर्धन चौधरी यांची केमेस्ट्री प्रेक्षकांना खूपच भावली आहे. यशच्या मनात नेहाबद्दल प्रेमाची भावना निर्माण झाली आहे. त्याने ही भावना नेहाजवळ व्यक्त देखील केली आहे. मात्र, नेहाच्या मनात याबाबत खूप गोंधळ आहे. मनातून तिला यश आवडतो परंतु आधीच्या लग्नाचा कटू अनुभव असल्यामुळे तिला हे नकोसे वाटते... अशा द्विधा मनस्थितीमध्ये असलेल्या नेहाच्या मनामध्ये यशबद्दलचे प्रेम तिच्याही नकळतपणे फुलू लागले आहे... दोघेहीजण त्यांच्यात फुलणारे प्रेमाचे हे अलवार क्षण अनुभवत आहेत... यश आणि नेहा यांच्यामध्ये प्रेमाचे नाते फुलत आहे. यशने नेहावरचे प्रेम व्यक्त केले आहे. मात्र नेहाला यशवरील तिच्या प्रेमाची जाणीव होऊनही तिने अजूनही ते मान्य केलेले नाही. म्हणूनच यशने तिला भेट म्हणून दिलेला ड्रेस जेव्हा ती घालते. तेव्हा ती स्वतःला समजावते, 'यशला काय वाटेल हा ड्रेस मी घातला आहे तर.... त्याने मला कारण विचारले तर त्याला सांगेन ड्रेस ठेवून ठेवून खराब होत होता म्हणून मी तो घातला. बाकी काहीही कारण नाही...' मालिकेच्या आगामी भागामध्ये नेहा यशने दिलेला ड्रेस घालून ऑफिसमध्ये जाते. नेहा जेव्हा यशच्या केबीनमध्ये जाते तेव्हा तिने आपणच दिलेला ड्रेस घातल्याचे त्याच्या लक्षातच येत नाही. तेव्हा नेहा नाराज होते. ती बाहेर निघून जाते. त्यानंतर नेहाने तू दिलेला ड्रेस घातला होता. हे ती तुला सांगण्याचा प्रयत्न करत होती, असे जेव्हा समीर यशला सांगतो. तेव्हा यशला झालेली चूक लक्षात येते. नेहाला सॉरी म्हणण्यासाठी तो केबीनमध्ये बाहेर येतो. यश नेहाशी बोलत असताना जेसिका नावाच्या एका परदेशी मुलीची एंट्री ऑफिसमध्ये होते. जेसिका तिथे आल्याआल्या यशला नेहासमोरच मिठी मारते. ते पाहून नेहाला मोठा धक्का बसतो. त्यानंतर समीर नेहाला सांगतो की जेसिका ही यशची एक्स गर्लफ्रेंड आहे. हे ऐकल्यानंतर नेहाच्या पाया खालची जमीन सरकते. तिला जेसिकाबद्दल आसुया वाटू लागते...नेहाला जेसिकाबद्दल वाटणारी आसुया समीरच्या लक्षात येते. याची जाणीव यशला देखील होणार का? जेसिकाच्या येण्यामुळे नेहाला यशसमोर तिचे प्रेम व्यक्त करू शकेल का? यामध्ये यशची सिम्मी काकू आणखी काय करणार या सर्व प्रश्नांची उत्तरे प्रेक्षकांना आगामी भागांमधून मिळणार आहे.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/y8Llxe4