मुंबई- भारतातून परदेशात होणाऱ्या चित्रीकरणाच्या बाबतीत इंग्लंड आणि आखाती देशांव्यतिरिक्त, रशियालाही मोठी मागणी आहे. अलिकडच्या वर्षांत, रशियामध्ये अनेक चित्रपटांचं चित्रीकरण झालं आहे. विकी कौशलच्या 'सरदार उधम सिंग' पासून ते अजय देवगणच्या 'रनवे ३४' आणि सलमान खानच्या 'टायगर ३' असे अनेक सिनेमे आहेत ज्यांचं चित्रीकरण रशियाच्या प्रमुख शहरांमध्ये झालं आहे. सध्या आणि रशियामध्ये युद्ध सुरू आहे परिस्थिती आहे, तरीही तिथे अनेक चित्रपटांच्या चित्रीकरणाच्या तारखांबद्दल विचारलं जात आहे. नागा चैतन्य, रश्मिका मंदान्ना, मृणाल ठाकूर तिघंही त्यांच्या आगामी सिनेमाच्या चित्रीकरणासाठी रशियामध्ये शूटिंग करत होते. दोन महिन्यांपूर्वी धर्मा प्रॉडक्शनच्या 'जुग जुग जिओ' ची टीमही तिथे होती. एवढंंच नाही तर सोमवारीच अर्जुन कपूर आणि भूमी पेडणेकर यांच्या आगामी प्रोजेक्टच्या चित्रीकरणासंबंधीच्या तारखांची आणि लोकेशनची चौकशी तिथे करण्यात आली. मॉस्को येथील एका शूट ऑपरेटरने यासंबंधीची माहिती दिली. सर्व चित्रपट युक्रेनच्या सीमेपासून दूर शूट केले जात आहेत सध्या युद्धजन्य परिस्थिती असूनही, रशियामध्ये अनेक ठिकाणी सिनेमांचं चित्रीकरण अजूनही सुरूच आहे. याचंमुख्य कारण म्हणजे चित्रीकरण अशा भागांत होत आहे, जे युक्रेनच्या सीमेपासून दूर आहेत. त्यामुळेच युद्धाचा चित्रीकरणावर कोणताही परिणाम झाला नाही. १२ फेब्रुवारीपर्यंत मृणाल ठाकूर आणि रश्मिका मंदान्ना रशियामध्ये तेलगू चित्रपटाचं शूटिंग करत होत्या. बॉलिवूड आणि टॉलिवूड प्रोजेक्ट्सचे शूटिंग रशियात होत आहे भूमीने नुकतेच 'भक्षक' चे शूटिंग पूर्ण केले. अर्जुन कपूर उत्तराखंडमध्ये जॉन अब्राहमसोबत मल्याळम चित्रपट 'अय्यपनम कोशियुम'च्या रिमेकचे शूटिंग रशियातच सुरू करणार आहेत. सध्या बॉलिवूड आणि टॉलिवूडचे अनेक मोठे प्रोजेक्ट रशियामध्ये शूट केले जात आहेत. नागा चैतन्य नुकताच 'थँक्यू' चित्रपटासाठी इथे शूटिंग करत होता. ५ फेब्रुवारीला त्याचं शेड्यूल पूर्ण झालं. एवढंच नाही तर सलग २० दिवस उणे १० ते १४ अंश सेल्सिअस तापमानात त्याने शूट पूर्ण केलं. ''च्या उर्वरित भागांचे शूटिंगही रशियात होणार कोविडच्या वाढत्या रुग्णांमुळे लंडनमध्ये गेल्या वर्षी २७ डिसेंबरला गणपतची टीम भारतात परतली होती. तिथे ७ जानेवारीपर्यंत शूटिंग होणार होती. त्यामुळे 'गणपत' चे काही भाग लंडनमध्ये शूट होऊ शकले नाहीत. आता सिनेमाचा काही भाग रशियाला तर काही भाग मुंबईत शूट होणार आहे. असं म्हटलं जातं की मार्चअखेरीस टीम तिथे जाऊ शकते. सध्या या चित्रपटाचे शूटिंग ०५ मार्चपासून मुंबईत सुरू होणार आहे. 'रनवे ३४' चे शूटिंग रशियाच्या नाइट क्लब आणि रस्त्यांवर करण्यात आले अजय देवगण आणि करण जोहरच्या बॅनरअंतर्गत बनलेल्या या चित्रपटांचं शूटिंगही गेल्या वर्षी रशियात झाले होते. त्याच्या प्रॉडक्शन हाऊसच्या जवळच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अजयच्या 'रनवे ३४' एअरपोर्टवरील सीन मॉस्को एअरपोर्टवर शूट करण्यात आले आहेत. याशिवाय चित्रपटातील महत्त्वाच्या सीन्सचे शूटिंग तिथल्या नाइट क्लब आणि रस्त्यांवर करण्यात आले आहेत. अजय आणि बाकी टीमने १० दिवस रशियातील वेगवेगळ्या ठिकाणी चित्रीकरण केले. प्रत्यक्षात कतार विमानतळावर जे सीन होणार होते ते लॉकडाउनमुळे होऊ शकले नाहीत. त्यामुळे टीमने ते सीन रशियात शूट केले.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/OuZleSN