Full Width(True/False)

लता मंगेशकरांना आई स्थानी मानायचा सचिन तेंडुलकर, होतं खास नातं

मुंबई- गानकोकिळा यांचं नुकतंच निधन झालं. वयाच्या ९२ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या अनेक दिवसांपासून ब्रीच कँडी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र आज त्यांची प्राणज्योत मालवली. दीदींच्या जाण्यानं देश शोकसागरात बुडाला आहे. जगभरात त्यांचे लाखो चाहते होते. पण त्यांचा एक असा चाहता होता ज्याचं लता दीदींच्या मनात एक अढळ स्थान होतं. तो म्हणजे मास्टर ब्लास्टर . लता दीदी- लता मंगेशकर आणि सचिन तेंडुलकर या आपापल्या क्षेत्रातील दोन दिग्गजांना एकमेकांबद्दल नेहमीच आपुलकी आणि आदर राहिला आहे. लता दीदींच्या प्रत्येक वाढदिवसाला सचिन त्यांना खास मेसेज पाठवून शुभेच्छा द्यायचा, तर लता दीदीदेखील सचिनच्या प्रत्येक वाढदिवसाला त्याला शुभेच्छा द्यायला विसरायच्या नाहीत. दोघांमध्ये नेहमीच संवाद असायचा. २०१९ मध्येही लता दीदींच्या वाढदिवसानिमित, मास्टर ब्लास्टरने एक व्हिडिओ बनवत लता दीदींना शुभेच्छा दिल्या होत्या. सचिन नियमितपणे लतादीदींना भेटायलाही जायचा. वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्याबरोबरच सचिन नेहमीच लतादीदींच्या उत्तम आरोग्यासाठी प्रार्थना करायचा. 'मी लहान असल्यापासून लतादीदींची गाणी ऐकली आहेत. मी तुमचं पहिलं गाणं कधी ऐकलं हे सांगता येऊ शकत नाही हे प्रामाणिकपणे सांगू इच्छितो, असं सचिन एकदा म्हणाला होता. तसंच लतादीदींनी गायलेली गाणी मला प्रचंड आवडतात. त्यांचं गाणं मी ऐकलं नाही असा एकही दिवस नाही, असंही तो म्हणाला होता. लता मंगेशकर ही मला देवानं दिलेली सर्वात मोठी भेट आहे असं म्हणत सचिननं त्याच्या भावना व्यक्त केल्या होत्या. दरम्यान, सचिन तेंडुलकर हा लतादीदींच्या गाण्यांचा प्रचंड चाहता आहे. सचिनच्या वॉकमॅनमध्ये लतादीदींच्या गाण्यांचं खास कलेक्शन असायचं. फावल्या वेळेत किंवा प्रवासात हीच गाणी तो ऐकायचा आणि मनसोक्त आनंद लुटायचा. दुसरीकडे लतादीदीही सचिनच्या प्रचंड चाहत्या आहेत. सचिनच्या फलंदाजीचं त्या नेहमी कौतुक करायच्या. एकदा लता मंगेशकर यांनी सचिन तेंडुलकरसाठी गाणे गायले होते यावरून दोघांमधील स्नेहाचा अंदाज लावता येतो. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. सचिनच्या सांगण्यावरून लताजींनी 'साया' चित्रपटातील 'तू जहाँ जहाँ रहेगा' हे लोकप्रिय गाणे गायले होते.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/6UkXhM7