Full Width(True/False)

'माझी तुझी रेशीमगाठ' मालिकेत येणार मोठा ट्विस्ट, यश आणि नेहा...

मुंबई : माझी तुझी रेशीमगाठ मालिका घराघरात लोकप्रिय झाली आहे. या मालिकेतील नेहा कामत आणि यशवर्धन चौधरी ही जोडी तसेच चिमुकली परी देखील प्रेक्षकांना भावली आहे. सध्या ही मालिका मनोरंजन टप्प्यावर येऊन ठेपली आहे. यशने नेहावर प्रेम असल्याचे आधीच सांगितले आहे. परंतु त्या दोघांमध्ये असलेल्या आर्थिक फरकामुळे नेहाने त्याचे प्रेम स्वीकारलेले नाही. परंतु मनातून तिला देखील यश आवडत असतो. मात्र ती हे जाहीरपणे सांगू शकत नाही. त्यातच आता यशची एक्स गर्लफ्रेंड जेसीका आल्यामुळे नेहा अस्वस्थ झाली आहे. मालिकेच्या आगामी भागामध्ये नेहा यशवर प्रेम असल्याची कबुली देणार आहे. यशचा खास मित्र समीर याला नेहाच्या मनातील घालमेल समजत असते. त्यामुळे नेहाने तिचे यशवर असलेले प्रेम व्यक्त करावे, यासाठी एक जबरदस्त प्लॅन आखला होता. त्या प्लॅनचा भाग म्हणून यश आणि नेहाच्यामध्ये जेसिका येते. जेसिका ही यशची एक्स गर्लफ्रेंड असल्याचा बनाव समीर रचतो. जेसिका पुन्हा एकदा यशच्या आयुष्यात आली आहे, तिचे यशवर तिचे प्रेम आहे ते पैशांसाठी असे सगळे समीर नेहाला सांगतो. नेहाच्या मनातही यशबद्दल प्रेम निर्माण झालेले असते त्यामुळे ती या सगळ्या गोष्टींमुळे अस्वस्थ होते. परंतु यशवरील तिचे प्रेम ती व्यक्त करू शकत नाही. उलट यशला ती जेसिकाबरोबर लग्न कर असे सांगते. नेहाच्या मनातील यशबद्दलच्या ज्या भावना आहेत, त्या व्यक्त करण्यासाठी समीर एक जबरदस्त प्लॅन आखतो. त्यामध्ये यशला तो जेसिकाला लग्नाची मागणी घालायला सांगतो. तसेच ही बातमी तो नेहापर्यंत पोहोचेल अशीही व्यवस्था करतो. नेहाला जेव्हा हे कळते तेव्हा यश जेसिकाला लग्नाची मागणी घालत असताना तिथे ती पोहोचते आणि त्यांना थांबवते. नेहा म्हणते, 'जेसिका तू यशला फसवायला निघाली आहेस... मला हे अजिबात मान्य नाही.' यावर यश चिडून नेहाला म्हणतो,'यात तुझा काय संबंध? माझ्या आयुष्यात काही वाईट घडत असेल तर त्याचा त्रास तुला का होतोय? का एवढी जवळ येतेस माझ्या?' त्यावर नेहा त्याला सांगते, 'कारण माझे तुझ्यावर प्रेम आहे...' असे म्हणून नेहा यशला मिठी मारते.... मालिकेचा हा भाग येत्या शनिवारी झी मराठीवरून प्रसारित होणार आहे. नेहा आणि यशला एकत्र आणण्याचा समीरचा प्लॅन अखेर यशस्वी होतो. आता यश आणि नेहाचे लग्न होणार का? आजोबा त्यांच्या लग्नाला मान्यता देणार का? यशची सिम्मी काकू त्या दोघांमध्ये दुरावा आणण्यासाठी काही प्लॅन आखणार का... या आणि अशा सर्व प्रश्नांची उत्तरे मालिकेच्या आगामी भागातून मिळणार आहेत.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/aGZkIEK