Full Width(True/False)

फक्त ५० रुपयात घरी मागवा आपले PVC Aadhar Card, कधीच खराब होणार नाही

नवी दिल्लीः आता सर्वांसाठी आवश्यक डॉक्यूमेंट बनले आहे. अनेक कामांसाठी आता आधारचा वापर केला जातो. सरकारी काम असो की खासगी, आधार कार्ड आता आवश्यक समजले जाते. सरकारी योजना पासून, मोबाइल फोन सिम कार्डसाठी आधारची विचारना केली जाते. आधार कार्ड जर खराब होऊ नये असे तुम्हाला वाटत असेल तर याला प्लास्टिक मटेरियलच्या वर प्रिंट करून घ्या. तसेच तुम्ही ऑनलाइन प्रोसेसच्या मदतीने आधार कार्ड पीव्हीसी कार्ड मध्ये कन्वर्ट करू शकता. यासाठी तुम्हाला फक्त ५० रुपये खर्च करावे लागतील. आधार कार्ड पीव्हीसी कार्डसाठी अर्ज कसा कराल नवीन आधार पीव्हीसी कार्ड ऑनलाइन ऑर्डर केले जावू शकते. ऑनलाइन ऑर्डर करण्याची प्रक्रिया खाली सांगितली आहे. १) अधिकृत आधार वेबसाइटवर जा. माय आधार टॅब अंतर्गत आधार पीव्हीसी ऑर्डर वर क्लिक करा. २) आपले आधार कार्ड नंबर किंवा व्हर्च्युअल आयडी नंबर किंवा ईआयडी नंबर टाका. सुरक्षा कोडची नोंद करा. ओटीपी पाठवा. किंवा टीओटीपी बटनवर क्लिक करा. आपल्या मोबाइलवर टाइम बेस्ड वन टाइम पासवर्ड मिळवण्यासाठी सेंड टीओटीपीवर क्लिक करा. आपल्या मोबाइल नंबरवर ओटीपी टाका. नियम आणि अटीच्या ऑप्शन निवडा आणि सबमिट बटनवर क्लिक करा. ३) आपले आधार कार्डचा प्रीव्ह्यू तुमच्या स्क्रीनवर दिसेल. त्यावर पेमेंट करुन क्लिक करा. जर तुमचा मोबाइल नंबर लिंक नसेल तर तुमचे आधार कार्डचा प्रीव्ह्यू उपलब्ध होणार नाही. ४) पेमेंट ऑप्शन निवडा. क्रेडिट किंवा डेबिट कार्डवरून पेमेंट करा. त्यानंतर क्लिक करा. आपल्या नेट बँकिंगच्या माध्यमातून पेमेंट करा. यूपीआय प्रणालीद्वारे पेमेंट करण्यासाठी यूपीआय वर क्लिक करा. आधार पीव्हीसी कार्ड मिळवण्यासाठी ५० रुपये द्यावे लागतील. ५) तुमची पेमेंट रसीद बनते. तुम्ही याला डाउनलोड करू शकता. रशीदल पीडीएफ फॉर्मेट करू शकता. ६) आदेश प्राप्त होता पाच दिवसाच्या कार्यकाळात आधार पीव्हीसी कार्ड पोस्ट ऑफिसद्वारे तुम्हाला घरपोच मिळू शकते. वाचाः वाचा: वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/WaCqcX7