Full Width(True/False)

Lata Mangeshkar death live Updates: गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचे निधन

मुंबई: गानसम्राज्ञी भारतरत्न यांचं नुकतचं निधन झालं असून वयाच्या ९२ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या दोन दिवसांपासून त्यांची प्रकृती खालावली होती. अखेर आज ब्रीच कँडी रुग्णालयात त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांनी त्यांच्या निधनामुळे संपूर्ण कलाविश्वावर शोककळा पसरली आहे. दिग्गजांनी लता दीदींना श्रद्धांजली वाहिली आहे.
  • निधनाची सर्वप्रथम माहिती केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिली
नितीन गडकरी हे आज सकाळी मुंबईतील ब्रिच कँडी रुग्णालयात आले आणि रुग्णालय प्रशासनाशी चर्चा केल्यानंतर रुग्णालयाबाहेर येऊन लतादीदींच्या निधनाची माहिती दिली
  • लतादीदींचं पार्थिव १२ ते १२.३०वाजण्याच्या दरम्यान ब्रिच कँडी रुग्णालयातून 'प्रभू कुंज' या त्यांच्या निवासस्थानी नेण्यात येणार
  • लता दिदींच्या जाण्यानं एका स्वर युगाचा अंत झाला, एक महान पर्व संपले. आमच्यावरचा मातृतुल्य आशीर्वाद हरपला, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या
  • लता मंगेशकर यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्याच्या सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्या
  • संगीत क्षेत्रातील ध्रुवतारा निखळला अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी आपल्या शोकभावना व्यक्त केली
  • आज देशानं केवळ आवाज नव्हे तर भारतीय संगीतानं आत्मा गमावला: विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस
  • लता दीदींच्या सुरांनी श्रीमंत केलं; आरती अंकलीकर टिकेकर यांची प्रतिक्रिया
  • दीदींच्या निधनानं अवघा देश शोकाकुल
  • भारताचा आवाज हरपला; केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी वाहिली श्रद्धांजली
  • दोन दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर
  • दादरच्या शिवाजी पार्क स्मशानभमीत अंत्यसंस्कार होणार
  • अभिनेता अक्षय कुमारनं वाहिली लता दीदींना श्रद्धांजली
  • युग संपले..लता दीदींच्या निधनानानंतर खासदार संजय राऊत यांचे ट्विट
  • उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी सोशल मीडियाद्वारे वाहिली श्रद्धांजली
  • लतादीदींच्या आवाजाच्या परीसस्पर्शाने अजरामर झालेल्या गीतांच्या माध्यमातून हा स्वर आता अनंतकाळ आपल्या मनांमध्ये गुंजन करत राहील, राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/zmr0PhM