Full Width(True/False)

५०MP कॅमेऱ्यासह येणाऱ्या Oppo Reno 7 Pro 5G वर बंपर डिस्काउंट, पहिल्या सेलमध्ये मिळेल आकर्षक ऑफर्सचा फायदा

नवी दिल्ली: काही दिवसांपूर्वीच लाँच झालेल्या चा सेल आजपासून म्हणजेच ८ फेब्रुवारीपासून सुरू होत आहे. १२ जीबी रॅम आणि २५६ जीबी स्टोरेजसह येणाऱ्या या फोनची किंमत ३९,९९९ रुपये आहे. पहिल्या सेलमध्ये कंपनीने या फोनवर अनेक शानदार ऑफर्सची घोषणा केली आहे. यामध्ये ४ हजार रुपयांपर्यंत इंस्टंट डिस्काउंट आणि कॅशबॅकसह अतिरिक्त एक्सचेंज बोनस सारख्या ऑफरचा देखील समावेश आहे. ओप्पोच्या या फोनला फ्लिपकार्टसह ऑफलाइन रिटेलर्सकडून देखील खरेदी करता येईल. या फोनला ऑनलाइन अथवा ऑफलाइन खरेदी केल्यावरही ऑफर्सचा लाभ मिळेल. वाचा: ऑनलाइन खरेदीवर ऑफर तुम्ही जर Reno 7 Pro 5G स्मार्टफोनला ऑनलाइन खरेदी केल्यास ४ हजार रुपयांपर्यंत डिस्काउंट मिळेल. हा डिस्काउंट तुम्हाला अ‍ॅक्सिस बँक, स्टँडर्ड चार्टर्ड बँक आणि बँक ऑफ बडोदाच्या क्रेडिट कार्डने पेमेंट केल्यावर मिळेल. तसेच, एचडीएफसी बँकेच्या कार्ड्सने पेमेंट केल्यास तुम्हाला २ हजार रुपयांपर्यंत इंस्टंट डिस्काउंटचा लाभ मिळेल. या बँकांच्या कार्ड्सवर तुम्ही फोनला ६ महिन्यांच्या नो-कॉस्ट ईएमआयवर देखील खरेदी करू शकता. याशिवाय जुन्या फोनवर तुम्हाला ४ हजार रुपयांपर्यंत अतिरिक्त एक्सचेंज ऑफरचा लाभ मिळेल. एवढेच नाही तर कंपनी यूजर्सला लाँच ऑफर अंतर्गत १,३९९ रुपयात नेकबँड देखील देत आहे. ऑफलाइन खरेदीवर ऑफर तुम्ही जर Oppo Reno 7 Pro 5G ला ऑफलाइन खरेदी केल्यावर देखील अनेक शानदार ऑफरचा फायदा मिळेल. ऑफलाइन स्टोर्सवर ICICI बँक, कोटक बँक आणि स्टँडर्ड चार्टर्ड बँकेसह अनेक बँकांच्या क्रेडिट आणि डेबिट कार्डने पेमेंट केल्यास ४ हजार रुपयांपर्यंत कॅशबॅक मिळेल. याशिवाय फोनला बजाज फिनसर्व्ह, HDFC, ICICI आणि कोटक बँकेच्या 'Easy to own finance scheme' ऑफर अंतर्गत देखील खरेदी करू शकता. फोनला ओप्पो अपग्रेड स्कीम अंतर्गत देखील खरेदी करता येईल. या स्कीमची खास गोष्ट म्हणजे तुम्ही फोनला १२ महिने वापरून पुन्हा परत करू शकता व तुम्हाला ७० टक्के बायबॅक मिळेल. कंपनीच्या काही मेनलाइन स्टोर्सवर ओप्पो यूजर्सला १,९९९ रुपये किंमतीचा ओप्पो पॉवर बँक ३०वॉट केवळ १ रुपयात मिळत आहे. Oppo Reno 7 Pro 5G चे फीचर आणि स्पेसिफिकेशन Oppo Reno 7 Pro 5G स्मार्टफोनमध्ये ९० हर्ट्ज रिफ्रेश रेटसह ६.५ इंच फुल एचडी+ डिस्प्ले दिला आहे. यामध्ये १२ जीबी रॅमसह मीडियाटेक डायमेंसिटी १२०० मॅक्स चिपसेटचा सपोर्ट मिळेल. फोटोग्राफीसाठी फोनमध्ये रियरला ५० मेगापिक्सलचा ट्रिपल कॅमेरा सेटअप दिला आहे. तर सेल्फीसाठी ३२ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा मिळतो. वाचा: वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/YMjRiK8