Full Width(True/False)

'महाभारत'फेम अभिनेते प्रवीण कुमार सोबती यांचं निधन

मुंबई- 'महाभारतात' मालिकेत भीम ही भूमिका साकारणारे ज्येष्ठ अभिनेते यांचं निधन झालं. वयाच्या ७४ वर्षांचे त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांनी अनेक बॉलिवूड चित्रपटात काम केलं आहे. गेल्या काही दिवसांपासून ते आजाराशी झुंज देत होते.अखेर आज त्यांची प्राणज्योत मालवली. तसंच शेवटच्या काही वर्षांमध्ये त्यांना अनेक आर्थिक अडचणींचा सामना करावा लागला होता. १९८१ साली प्रदर्शित झालेल्या ‘रक्षा’ या चित्रपटातून प्रवीण कुमार सोबती यांनी अभिनयाच्या प्रवासाला सुरुवात केली होती. त्यानंतर प्रदर्शित झालेल्या ‘मेरी आवज सुनो’ या सिनेमातही महत्त्वाची भूमिका साकारली होती. प्रवीण यांच्या निधनानंतर सिनेसृष्टीतील कलाकारांनी शोक व्यक्त करत श्रद्धांजली वाहिली आहे. आंतरराष्ट्रीय कीर्तीचे अॅथलिट होते प्रवीण कुमार सोबती गेल्या काही महिन्यांपासून आजारी होते तसंच आर्थिक अडचणींचा ते सामना करत होते. प्रवीण कुमार हे आंतरराष्ट्रीय कीर्तीचे अॅथलिट होते. दोन ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये त्यांनी सहभाग घेतला होता. आशियाई क्रीडा स्पर्धा, राष्ट्रकुल स्पर्धेत त्यांनी अनेक सुवर्ण व रौप्य पदकं पटकावली होती. १९६७ साली त्यांना अर्जुन पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं होतं. प्रवीण कुमार यांनी ५० हून अधिक चित्रपटांत भूमिका केल्या होत्या. मात्र, महाभारतातील भीमाच्या भूमिकेमुळं ते खऱ्या अर्थानं घराघरांत पोहोचले होते.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/luN52qQ