Full Width(True/False)

Photos- शस्त्रक्रियेनंतर सुनील ग्रोवरला मिळाला डिस्चार्ज

मुंबई- प्रसिद्ध अभिनेता आणि कॉमेडियन सुनील ग्रोवरची अचानक प्रकृती बिघडल्यानंतर त्याला त्वरित मुंबईतील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. सुनीलवर हृदय शस्त्रक्रिया करण्यात आली. चाहत्यांना ही बातमी कळताच ते खूप काळजीत होते आणि तो लवकर बरा व्हावा यासाठी प्रार्थना करताना दिसले. सुनीलची शस्त्रक्रिया यशस्वी पार पडली असून त्याला रुग्णालयातून डिस्चार्ज करण्यात आलं आहे. डिस्चार्ज मिळाल्यानंतर त्याचा पहिला फोटो समोर आला आहे, ज्यामध्ये सुनील आधार घेऊन उभा दिसत आहे. मात्र, या अवस्थेतही त्याने छायाचित्रकारांंना हात दाखवत सगळं काही ठिक असल्याचं सांगताना दिसला. आपला आवडीचा कॉमेडियन बरा होऊन घरी जात असल्याचं पाहून चाहत्यांनाही दिलासा मिळाला. मिळालेल्या माहितीनुसार सुनीलच्या हृदयामध्ये काही ब्लॉकेज होते, त्यामुळे तातडीने सर्जरी करावी लागली होती. ४४ वर्षांचा असून आधीपासूनच त्याच्या तब्येतीबाबत तक्रार होती. तरी ही सुनील पुण्यात एका आगामी वेब सीरिजचं शूटिंग करत होता. शूटिंग संपल्यावर सुनीलला रुग्णालयात दाखल करण्यात आले आणि त्याच्यावर हृदय शस्त्रक्रिया झाली. दरम्यान, सुनीलच्या कामाबाबत बोलायचं झालं तर 'द कपिल शर्मा' चा शो सोडल्यानंतर तो चित्रपटात आणि वेब सीरिजमध्ये काम करताना दिसत आहे. त्याच्या 'सनफ्लॉवर' आणि 'तांडव' या दोन्ही वेब सीरिजला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. या दोन्ही सीरिजमध्ये चाहत्यांना त्याचं वेगळं रूप पाहायला मिळालं. तर मध्यंतरी त्याचा 'कानपुरवाले खुराना' नावाचा कॉमेडी शो पण आला होता परंतु कमी टीआरपीमुळे बंद झाला.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/FsifcvS