Full Width(True/False)

भारतात ७ किलोचे 'वॉशर' लाँच, किंमत फक्त ५,४९९ रुपये

नवी दिल्ली: थॉमसन ब्रँडने सर्व-नवीन स्मार्ट प्रो तंत्रज्ञानासह थॉमसन वॉशर्स (७ किलो) लाँच केले असून हे डिव्हाइस अत्यंत टिकाऊ ABS सामग्रीसह सुसज्ज आहे. जे, या वॉशर्सना शॉकप्रूफ आणि पाणी प्रतिरोधक बनवते. हे वॉशर ७ फेब्रुवारीपासून फ्लिपकार्टवर ५४९९ रुपयांना तुम्हाला खरेदी करता येईल. सुपर प्लास्ट्रोनिक्स प्रा. लि. आणि थॉमसन इंडिया ब्रँड परवानाधारक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी अवनीत सिंग मारवाह म्हणाले, “भारतातील गृहोपयोगी उपकरणांच्या श्रेणीत सातत्याने वाढ झाली आहे. यामध्ये मोठी उपकरणे आणि लहान उपकरणे यांचा समावेश आहे. 'मेक इन इंडिया'च्या आमच्या वचनबद्धतेनुसार हे कायम ठेवत आहोत. आम्ही भारतात आणि भारतासाठी उत्पादन करण्यासाठी खूप प्रयत्न करत आहोत. आजची बदलती जीवनशैली, प्राधान्यक्रम आणि कोविड १९ मुळे गृहोपयोगी वस्तूंच्या मागणीत वाढ झाली आहे. वाचा: प्रत्येकासाठी काहीतरी प्रदान करणे ही थॉमसनची खासियत आहे. कंपनी स्वस्त दरात उत्पादने पुरवते. वॉशर्स लाँच केल्यामुळे, ब्रँडने आपला पोर्टफोलिओ आणि उत्पादन श्रेणी वाढवली आहे. ज्यामुळे, भारतातील जलद वाढणाऱ्या गृहोपयोगी विभागामध्ये त्याचे स्थान मजबूत करण्यात मदत होईल. थॉमसन वॉशर हे एक उत्तम उत्पादन आहे. १००० कोटी रुपयांच्या कमाईचे कंपनीचे उद्दिष्ट आहे. थॉमसन २०२२ मध्ये अशी आणखी उत्पादने लाँच करेल आणि ऑफर देईल. स्वावलंबी भारतासाठी सरकारने दिलेल्या जोरामुळे प्रोत्साहित होऊन, यावर्षी ३० % वाढ होण्याची अपेक्षा आहे. स्थानिक मॅन्युफॅक्चरिंग फर्म आणि इलेक्ट्रॉनिक्स कंपनी SPPL (थॉमसन इंडिया ब्रँड परवानाधारक) या संधीकडे आशेने पाहत आहेत. कंपनी मेक इन इंडिया अंतर्गत जागतिक दर्जाचे तंत्रज्ञान तयार करत राहील. याशिवाय, पुढील दोन वर्षांत आणखी दोन कारखाने सुरू करण्याची कंपनीची योजना आहे. ज्याचे एक युनिट हापूरमध्ये उभारले जाणार आहे. तर दुसऱ्याचे ठिकाण अद्याप जाहीर झालेले नाही. आधीच २०० कोटी रुपयांच्या गुंतवणुकीसह, कंपनीने २ वर्ष किंवा त्याहून अधिक कालावधीत आणखी ३०० कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याची योजना आखली आहे. येत्या काही महिन्यांत ५,००० हून अधिक कामगारांना कामावर घेण्याचीही कंपनीची योजना आहे. २०१७ मध्ये बाजारात दाखल झाल्यानंतर स्मार्ट टीव्ही, वॉशिंग मशिन, एअर-कूलर नंतरचे हे चौथे उत्पादन आहे. २०२१ मध्ये, थॉमसनने ६५-इंच आणि ५५-इंच स्क्रीन आकाराचे टीव्ही सादर केले. ४K सेगमेंटमध्ये, ४३-इंच ३२-इंच आणि ४२ -इंच स्क्रीन आकारांना पूर्णपणे मागे टाकले असून मोठ्या स्क्रीनचे टीव्ही अधिक लोकप्रिय होत आहेत. विशेष म्हणजे, स्मार्ट टीव्ही मार्केटने वर्षभरात ६५ टक्के वाढ नोंदवली आहे. वाचा: वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/BIC2hWa