Full Width(True/False)

आता सोबतच कॅरी करा आपले एंटरटेन्मेंट, Portronics Pico 10 स्मार्ट म्यूजिक LED प्रोजेक्टर लाँच, पाहा डिटेल्स

नवी दिल्ली: पोर्टेबल आणि प्रगत ग्राहक इलेक्ट्रॉनिक्स कंपनी Portronics ने Pico 10 नुकताच लाँच केला असून हा कॉम्पॅक्ट स्मार्ट म्युझिक एलईडी प्रोजेक्टर एका स्विचसह येतो. जो, चालू होताच चांगला प्रभाव देतो. पोर्ट्रोनिक्स पिको १० कोणत्याही जागेचे सहजपणे मनोरंजन क्षेत्र, चित्रपटगृहात रूपांतर करते. हा एक अतिशय कॉम्पॅक्ट आणि शक्तिशाली पोर्टेबल एलईडी प्रोजेक्टर आहे. जो, स्टिरिओ वायरलेस संगीत प्रणालीसह येतो. यामध्ये शक्तिशाली २८० लाइट्स लुमेन एलईडी दिवे देण्यात आले आहेत. हे Android 9 वर आधारित आहे. हे कोणत्याही पृष्ठभागावर १५० इंचांपर्यंत प्रतिमा आणि व्हिडिओ प्रोजेक्ट करू शकते. हे ४८० p पर्यंत रिझोल्यूशन देते, ज्याच्या मदतीने चित्रे आणि व्हिडिओ अगदी स्पष्ट दिसतात. अँड्रॉइड ओएस आणि इनबिल्ट वाय-फाय नेटवर्कसह, आता तुम्ही नेटफ्लिक्स, हॉटस्टार, यूट्यूबचा तुम्हाला हवं तेव्हा, हवं तेव्हा आनंद घेऊ शकता. त्यामुळे तुम्ही कुठेही जाल, मनोरंजन तुमच्यासोबत असेल. वाचा: वैशिष्ट्ये: यात ५ W वायरलेस स्पीकर सिस्टीम आहे. जी, तुम्हाला एक चांगला मनोरंजनाचा अनुभव देईल. त्याच्या कीस्टोन सुधारणा वैशिष्ट्यासह,आपण भिंतीवर किंवा स्क्रीनवर प्रत्येक कोनात कोणताही व्हिडिओ किंवा चित्र प्रक्षेपित करू शकता. हे ऑटो आणि मॅन्युअल कीस्टोन दुरुस्तीसह काम करते. याद्वारे तुम्ही तुमच्या लॉनला मूव्ही हब बनवू शकता. यातील एकाधिक इंटरफेस पर्याय याला सर्वात युनिक बनवतात. कन्टेन्ट त्याच्या HDMI पोर्टवरून किंवा Miracast द्वारे वायरलेसपणे प्रवाहित करता येऊ शकते किंवा तुम्ही USB पेन ड्राइव्ह, AUX किंवा ब्लूटूथवरून चित्रपट किंवा संगीत प्ले करू शकता आणि तुम्हाला हवं तेव्हा तुम्ही तुमची खोली चित्रपटगृहात बदलू शकता. तुमचा गेमिंग कन्सोल (Xbox किंवा PS3/4) प्लग इन करून तुम्ही उत्तम गेमिंग अनुभव देखील मिळवू शकता. हे फुल-फंक्शन रिमोट किंवा फुल-फंक्शन कीबोर्डसह येते. पोर्ट्रोनिक्स पिको 10 स्मार्ट म्युझिक एलईडी प्रोजेक्टरची किंमत १९,९०० रुपये आहे. हे कंपनीच्या अधिकृत वेबसाइट आणि इतर आघाडीच्या ऑनलाइन आणि ऑफलाइन स्टोअरवर उपलब्ध आहे. हे उत्पादन १२ महिन्यांच्या वॉरंटीसह येते. Portronics Pico 10 प्रोजेक्टर सहज तुम्हाला भन्नाट अनुभव देईल. २०, ००० रुपयांच्या किमतीच्या रेंजमध्ये येणारे पोर्ट्रोनिक्स पिको १० हे जबरदस्त प्रोजेक्क्टर डिव्हाइस प्रोजेक्टर खरेदी करणाऱ्यांकरिता एक चांगला पर्याय ठरू शकते. Portronics Pico 10 च्या मदतीने तुम्ही कुटुंबासह नेटफ्लिक्स, हॉटस्टार, यूट्यूबवरील शोजचा आनंद घेऊ शकता. वाचा: वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/GbRjXH3hi