Full Width(True/False)

बजेट स्मार्टफोन Realme Narzo 50 आज करणार भारतात एन्ट्री, मिळतील 'हे' खास फीचर्स

नवी दिल्ली: स्मार्टफोन ब्रँड Realme आज एका ऑनलाइन इव्हेंट दरम्यान कंपनीच्या लोकप्रिय Narzo सीरीज अंतर्गत स्मार्टफोन लाँच करणार आहे. लॉंचिंग इव्हेंट कंपनीच्या YouTube आणि सोशल मीडिया हँडलवर लाईव्ह पाहता येईल. Realme Narzo 50 Amazon द्वारे विक्रीसाठी उपलब्ध असेल. हँडसेटसाठी एक इनफार्मेशन पेज ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर तयार केले करण्यात आले आहे. Realme Narzo 50 सीरिजने सप्टेंबर २०२१ मध्ये पदार्पण केले होते. त्यात Realme Narzo 50A आणि Realme Narzo 50i यांचा समावेश होता. त्यावेळी, कंपनीने Realme Narzo 50 बद्दल काहीच खुलासा केला नव्हता. पण, आता लाँचपूर्वी कंपनीने या आगामी स्मार्टफोनचे काही फीचर्स उघड केले आहेत. हे एफसीसी लिस्टिंगवर देखील दिसून आले आहे. वाचा: Realme Narzo 50 चे संभाव्य तपशील: Realme ने कन्फर्म केले आहे की, हँडसेटमध्ये ३३-वॉट फास्ट चार्जिंग सपोर्टसह ५,००० mAh ची जबरदस्त बॅटरी असेल. सूचीनुसार, हँडसेट MediaTek Helio G96 प्रोसेसरद्वारे समर्थित असेल आणि १२० Hz रिफ्रेश रेट स्क्रीन ऑफर करेल. FCC सूचीमध्ये मॉडेल क्रमांक RMX 3286 सह येणार्‍या फोनच्या कथित चित्रांसह आणखी काही प्रमुख वैशिष्ट्यांसह डिव्हाइस दाखविण्यात आले आहे. प्रतिमेनुसार, Realme Narzo 50 सेल्फी कॅमेर्‍यासाठी पुढील बाजूस पंच-होल कटआउटसह येईल. कॅमेरा कटआउट वरच्या डाव्या कोपर्यात ठेवला जाईल. मागील बाजूस, हँडसेटमध्ये ट्रिपल कॅमेरा सेटअप असेल. फोनच्या मागील बाजूस पॅटर्नयुक्त फिनिश असेल. डिव्हाइस 33-वॉट डार्ट चार्जरसह येईल आणि कंपनीच्या स्वतःच्या Android 12 वर आधारित Realme UI 3.0 वर काम करेल अशी अपेक्षा आहे. Realme Narzo 50 मध्ये ६.६ -इंचाचा डिस्प्ले दिला जाऊ शकतो. वर नमूद केल्याप्रमाणे, डिव्हाइसचा रिफ्रेश दर१२० Hz असेल. हँडसेटमध्ये पॉवर बटणावर साइड-माउंट फिंगरप्रिंट स्कॅनर देखील असेल. FCC सूचीवरून असे दिसून आले आहे की, स्मार्टफोन १६४1 x ७५.५ x ८.५ mm असेल. यात २ MP मॅक्रो सेन्सर आणि २ MP डेप्थ सेन्सरसह ५० MP मुख्य सेन्सर वैशिष्ट्यीकृत असल्याचे सांगितले जात आहे. सेल्फीसाठी, यात १६ MP सेल्फी कॅमेरा देखील असेल. Realme narzo 50A मध्ये मजबूत बॅटरीशिवाय बाकीचे फिचर्स खूप चांगले आहेत आणि किंमत अगदी कमी आहे. फोनमध्ये चांगली कामगिरी, ६००० mAh बॅटरी आहे. ५० MP + २MPमध्ये + २MP चा प्राथमिक कॅमेरा आहे आणि ८ MP सेल्फी कॅमेरा आहे. वाचा: वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/brF235N