Full Width(True/False)

Amazon वर ५० रुपयात मिळतायत अनेक शानदार गॅजेट्स, स्मार्टफोनसोबत करता येईल वापर; पाहा लिस्ट

नवी दिल्ली: ऑनलाइन शॉपिंग प्लॅटफॉर्म आणि वर अनेक प्रोडक्ट्स स्वस्तात उपलब्ध आहेत. काही प्रोडक्ट्सची किंमत तर ५० रुपयांपेक्षा कमी आहे. मात्र, या प्रोडक्ट्सचा उपयोग तुम्हाला अनेक कामांसाठी होतो. आम्ही तुम्हाला अशाच काही प्रोडक्ट्सची माहिती देणार आहोत, ज्यांची किंमत ५० रुपयांपेक्षा कमी आहे. या गॅजेट्सचा वापर तुम्ही स्मार्टफोनसोबत करू शकता. या लिस्टमधील सर्वात पहिले प्रोडक्ट आहे हँड ग्लब्स. जर तुम्हाला स्मार्टफोनवर गेम्स खेळण्याची आवड असल्यास, हे प्रोडक्ट नक्कीच आवडेल. गेमिंग दरम्यान अंगठ्यांचा वारंवार वापर केल्यामुळे बोटं दुखतात. अशात तुम्ही खास अंगठ्यांसाठी असलेले हे ग्लब्स खरेदी करू शकता. Amazon वर याची किंमत फक्त २४ रुपये आहे. वाचा: आणि तुम्हाला जर व्हिडिओ पाहण्याची आवड असल्यास स्मार्टफोन होल्डर खूपच उपयोगी येईल. याच्या मदतीने तुम्ही स्मार्टफोनला कोठेही ठेवू शकता. केवळ व्हिडिओ पाहण्यासाठीच नाही तर व्हिडिओ कॉलिंग दरम्यान फोनला एका ठिकाणी ठेवण्यासाठी याचा उपयोग होईल. Amazon वर हे प्रोडक्ट फक्त ४९ रुपयात उपलब्ध आहे. स्मार्टफोन यूजर्ससाठी अडॅप्टर देखील खूपच उपयोगी प्रोडक्ट आहे. फोनला पेन ड्राइव्ह कनेक्ट करायचा असेल तर हे प्रोडक्ट उपयोगी येते. याच्या मदतीने तुम्ही डेटा फोनवरून पेन ड्राइव्हमध्ये ट्रान्सफर करू शकता. Amazon वर या प्रोडक्ट किंमत फक्त २९ रुपये आहे. आणि स्मार्टफोनचा वापर करत असाल तर Ejector Pin चे महत्त्व तुम्हाला माहिती असेलच. फोनमधून सिम कार्ड अथवा मेमरी कार्ड काढायचे असल्यास ही पिन खूपच उपयोगी येते. कमी किंमतीत येणारे प्रोडक्ट खूपच कामाचे आहे. Amazon वर तुम्हाला ३५ रुपयात ५ SIM कार्ड Ejector Pin मिळतील. म्हणजेच एका पिनसाठी फक्त ७ रुपये खर्च करावे लागतील. तसेच, Universal Touch Screen Stylus Pen चा देखील तुम्ही फोनसोबत वापर करू शकता. हे प्रोडक्ट किती काम करेल याची कोणतीही गॅरेंटी नाही. मात्र, ५० रुपयांपेक्षा कमी किंमत असल्याने एकदा वापर करायलाच हवा. याचा वापर मोबाइल स्टँड म्हणूनही करता येईल. Amazon वर याची किंमत फक्त ३५ रुपये आहे. वाचा वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/FD4fLgN